‛स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम येसूबाईची अभिनेता सुभाष यादव सोबत ‘भाऊबीज’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दिपावलीतील भाऊबीज सण हा भावा-बहिणीच्या अतूट बंधनातील नात्याचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा भावाबहिणीच्या भावनिक नात्यालाही या सणामुळे वेगळीच ओळख मिळत असून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेमधील ‘महाराणी येसूबाई’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड़ हीने मराठी चित्रपट अभिनेता सुभाष यादव यांचे औक्षण करून एक वेगळ्या स्वरूपात भाऊबीज साजरी करत आपल्या भावाला सुखद धक्का दिला आहे.

दौंड तालुक्यातील रहिवाशी असणाऱ्या सुभाष यादवणे आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधे काम केले आहे. लवकरच त्याची प्रमुख नायक भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होत असून तो ‘कॉमेडी तड़का’ या शोमुळे खूपच लोकप्रिय आहे. अनेक वर्षांपासून अभिनेत्री प्राजक्ता आणि अभिनेता सुभाष न चुकता भाऊबीज, रक्षाबंधन साजरा करतात ते अनावश्यक खर्च टाळून अनाथ आश्रम, वृद्धाश्रमला मदत करत आले आहेत.

याबाबत खुद्द अभिनेता सुभाष यादव याने फेसबूक वर भाऊबीज संदर्भात फोटोसह एक पोस्ट शेयर केली असून त्यात दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. या भावनिक फेसबूक पोस्ट मधे सुभाष लिहितो… ‘काय बोलू या बहिनी बद्दल..? माझ्या पाठीशी नेहमी खंबीर उभी राहनारी व वयाने लहान असूनही विचारांनी खुपच प्रगल्भ व ठाम असणारी अशी ही बहीण.. प्रचंड वाचन व अतिशय उत्तम अभिनय क्षमता असलेली व अभिनयाबरोबरच शिक्षणाचे शिवधनुष्य पेलनारी अशी ही बहीण.. प्राजक्ताताई, मला तुझा अभिमान वाटतो.. अशी बहीन मला प्रत्येक जन्मी मिळो”.

Visit : Policenama.com