Swarajya Sanghatana | छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव व करण गायकर यांची नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Swarajya Sanghatana | राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatana) अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव (Dr. Dhananjay Rajaram Jadhav) आणि करण पंढरीनाथ गायकर (Karan Pandharinath Gaykar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आणि स्वराज्य संघटनेची  स्थापना केली. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

 

डॉ. धनंजय जाधव आणि करण गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्याचबरोबर समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते मागील 14 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

 

 

Web Title :- Swarajya Sanghatana | Appointment As the spokesperson of Chhatrapati Sambhaji Raje’s Swarajya Sanghatana, Dr. Dhananjay Jadhav and Karan Gaikar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम