Swarajya Sanghatana | ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’; स्वराज्य संघटनेचे पुण्यात आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी संभाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य संघटनेतर्फे (Swarajya Sanghatana) राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात आले. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना राज्यपाल हजेरी लावणार आहेत. हे सर्व कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न स्वराज्य संघटनेकडून (Swarajya Sanghatana) केला जात आहे.
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही राजभवनाबाहेर जमले आहेत. राज्यपालांना ‘शिवाजी कोण होता? हे पुस्तक देत इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सह्या करून, घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारींचा निषेध करण्यात आला होता. स्वराज्य संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त
कार्यक्रमात भाषण केले होते. यावेळी राज्यपाल म्हणाले, शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले
आहेत. आता नवीन काळात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून नितीन गडकरी ते शरद पवार यांच्यापर्यंत सर्व
नायक मिळतील. त्यामुळे वाद उफाळला होता. शिवाजी महाराज कधीही जुने होणार नाहीत.
त्यांच्या धोरणांमुळेच महाराष्ट्र एकसंघ आहे आणि देशात लोकशाहीची मुळे त्यांच्या काळापासून रुजली गेली आहेत,
असे एकंदरीत मत सर्व विरोधी पक्षांनी दिले.
तसेच त्यांनी शिवजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करा,
अशी मागणी सर्व भातपेतर पक्षांनी केली आहे. भाजपचे एकमेव नेते खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील
ही मागणी केली आहे.

Web Title :- Swarajya Sanghatana | swarajya aggressive by showing black flags to the governor bahagt singh koshyari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | प्रेमात खर्चलेल्या पैशांची मागणी करत तरुणीवर बलात्कार; भोसरी परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार

Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत