निवडणूकीच्या धामधुमीत स्वारगेट पोलिसांकडून तब्बल 58 लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना स्वारगेट पोलिसांनी 58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 58 लाख 54 हजार 670 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही बुधवारी (दि.16) रात्री अकराच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रिय निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी देण्यात आली आहे.

उपेंद्र रामबीर परमार (वय-21 रा. 94 बिल्डींग, तिसरा मजला, 58 ए काळबादेवी रोड, मुंबई) आणि गोरख गोपालसिंग परमार (रा. मंगळवार पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी स्वारगेट बसस्थानकामधील सोलापूर बस स्थानकाजवळ दोन व्यक्ती संशयास्पद रित्या आढळून आले.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आढळली. पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्याकडे मिळालेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. तसेच याची माहिती क्षेत्रिय निवडणूक अधिकाऱ्यांना दिली.

ही कारवाई स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक शबनम शेख, पोलीस शिपाई अभिजीत राऊत, बालाजी पवार, होमगार्ड दिपक गायकवाड, सुधीर शेळके यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी