पुणे : Swargate Pune Crime News | प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्यानंतर पाठलाग करुन भर रस्त्यात तरुणीचा हात पकडून लग्नाची मागणी करणार्या प्रियकराला पोलिसांनी चांगलाच हात दाखविला.
अभिजित श्रावण गायकवाड Abhijit Shravan Gaikwad (वय २९, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी) याला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) अटक केली आहे. याबाबत येरवडा येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
तरुणीने प्रेमास नकार दिल्यानंतर तिला वाटेत गाठून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रसंगी तिला मारुन टाकण्याचे अनेक प्रकार राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडत आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अभिजित गायकवाड यांच्यात ३ वर्ष प्रेमसंबंध होते.
काही कारणाने फिर्यादी यांनी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिचा पाठलाग करीत असे.
फिर्यादी या सोमवारी दुपारी साडेतीन वाजता स्वारगेट बसस्टँड समोरील रोडवर आल्या असताना अभिजित याने त्यांना अडविले. (Swargate Pune Crime News)
तिचा हात पकडून तू माझ्या सोबत लग्न कशी करत नाहीस, तेच बघतो,
असे म्हणून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन शिवीगाळ केली.
फिर्यादी व तिच्या घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. यामुळे घाबरुन तरुणीने पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी अभिजित याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग (PSI Rahul Jog) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली !
विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP