Swargate Pune Crime News | रिक्षाचा नंबर लावण्यावरुन रिक्षाचालकांकडून कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्वारगेट एसटी स्थानकावरील घटना

Swargate Pune Crime News | Attempted stabbing by rickshaw pullers to death for putting rickshaw number; Incident at Swargate ST station

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Swargate Pune Crime News | रिक्षाचा नंबर लावण्यावरुन आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी रिक्षाचालकावर कोयत्याने (Koyta Attack) सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

जैनउद्दीन शाहजू भाईजान (वय ४८, रा. कोंढवा) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हुसेन मुख्तार खान्दान (वय ४३, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभय राजू कित्तूरकर याला अटक केली असून अंड्या ऊर्फ अनुप पासलकर, युवराज व त्यांच्या साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व रिक्षाचालक आहेत.

हा प्रकार स्वारगेट एस टी बसस्थानकाच्या आऊट गेटसमोरील कडुलिंबाच्या झाडाखाली बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील एस टी बसस्थानकाबाहेर रिक्षा लावण्यावरुन जैन उद्दीन यांचे मंगळवारी अनुप पासलकर याच्याबरोबर भांडणे झाली होती. जैनउद्दीन हे बुधवारी दुपारी इतर रिक्षाचालकांबरोबर रिक्षा घेऊन ग्राहकांची वाट पहात होते. त्यावेळी अनुप व युवराज दोघा साथीदारांना घेऊन तेथे आले. अनुप याने जैनउद्दीन यांना पकडून ठेवले. इतरांनी जैनउद्दीन याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यांच्या रिक्षाच्या काचा फोडून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. जैनउद्दीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे (PSI Ravindra Kaspte) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Tadipar Criminal Arrested | तडीपारीचा आदेशाचा भंग करुन शहरात वावरणार्‍या तडीपार गुंडाकडून २ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे हस्तगत

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

Total
0
Shares
Related Posts