पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Swargate Pune Crime News | साधकाच्या वेशात जैन मंदिरात जाऊन तेथील दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे.
नरेश आगरचंद जैन (रा. गिरगाव, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असा ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. (Swargate Police Station)
याबाबत जय परेश पारेख (रा. सिटीवुड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन चोरीला गेली होती. त्याच दिवशी शहरातील ३ ते ४ जैन मंदिरामधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता. कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पुजाअर्चा करतात. त्याचदिवशी चोऱ्या झाल्याने लोकांची धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तातडीने विशेष तपास पथकाची निर्मिती करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या खबऱ्यांकडून माहिती काढली. पोलीस हवालदार सागर केकाण यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले आहेत. संशयित आरोपी हा सध्या मुंबईतील गिरगाव येथील घरी आहे. त्यानुसार पोलिस पथक तातडीने मुंबईला जाऊन त्यांनी नरेश जैन याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पैशांच्या चणचणीतून देवाचे दागिने चोरल्याने सांगितले. त्याच्याकडून चोरलेले ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
नरेश जैन हा सराईत चोरटा असून राज्यातील बऱ्याच पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यावर यापूर्वीही घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात ८ ते १० ठिकाणी अशाच पद्धतीने जैन मंदिरांमध्ये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा मंदिरात जैन साधकाच्या वेशात जाऊन देवाचेच दागिने चोरी करत असल्याचे दिसून आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक तानवडे, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Hadapsar Pune Crime News | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण; पुणे शहरात खळबळ