Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swargate Pune Crime news | पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Rajgad Police Station) दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील (Attempt To Murder) आरोपीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या (Swargate Police Station) ठोकल्या आहेत. रोहन गौतम साळवे (वय-24 रा. कल्याण ता. हवेली जि. पुणे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुलटेकडी (Gultekadi) परिसरात केली आहे. आरोपीवर राजगड पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 353 नुसार गुन्हा दाखल आहे.

राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गुलटेकडी परिसरात आल्याची माहिती पोलीस अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुलटेकडी परिसरात शोध घेऊन रोहन साळवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासकामी राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे गीता बागवडे यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेक, दिपक खेंदाड, प्रविण गोडस, संदीप घुले, सुरज पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणे पडले महागात,
रवींद्र धंगेकरांसह 35-40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

PM Modi Road Show In Mumbai | PM नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो; शक्तीप्रदर्शन करणार, अशी असेल वाहतूक व्यवस्था, घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा…

Rohit Pawar On Mahayuti | बारामतीत महायुतीने 150 कोटी खर्च केले,
पण अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, महायुतीला एकूण…, रोहित पवारांनी वर्तविला अंदाज