Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swargate Pune Police | स्वारगेट परिसरातील वेगा सेंटर (Vega Center Swargate) येथील व्होडाफोन आयडिया प्रा. लि. कंपनीच्या (Vodafone Idea Pvt Ltd) मेन स्वीचिंग सेंटर येथून 54 लाख 54 हजार रुपये किंमतीचे लाईनकार्ड डिव्हाईस ची चोरी करण्यात आली होती. हा प्रकार 11 मार्च ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत घडला होता. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन स्वारगेट पोलिसांनी परराज्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.

याबाबत खिलचंद दिगंबर पाचपांडे (वय-23 रा. मस्के वस्ती, रावेत, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात 16 एप्रिल रोजी तक्रार दिली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील ऑफिस व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रीक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान लाईनकार्ड कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी चोरल्याचे निष्पन्न झाले.

सुरक्षारक्षक भरमुबिरप्पा पुजारी (वय-39 रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, कात्रज), टेक्निशियन दिपक मुरलीधर तडके
(वय-48 रा. शांती रक्षक सोसायटी, येरवडा) यांनी संगनमत करुन लाईन कार्ड चोरून प्रितमकुमार कामताप्रसाद कलम
(वय-32 रा.खडकवासला, पुणे) याला दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी लाईनकार्ड दिल्ली येथुन जप्त करुन
गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त,
पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस अंमलदार संदीप घुले, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, सुजय पवार, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रविण गोडसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yerawada Pune Police | पुणे : 2 पिस्तूल व 4 जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांकडून अटक (Video)

PMC Biomining Project | मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी बायोमायनिंग प्रकल्प 6 महिन्यांपासून ठप्प ! देवाची उरुळी, फुरसुंगी येथील नागरिकांचा जाच काही संपेना; ‘पॉवरफुल’ नेत्याच्या आशीर्वादाने घनकचरा विभाग सुसाट