पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swatantryacha Amrut Mahotsav | देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय तर्फे (Pune City Police Commissionerate) 10 कि. मी. अंतराच्या दौडचे (Daud) आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 8 या दरम्यान पोलीस शहर पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासाठी 10 किमीची दौडचे आयोजन केले असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त, प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर (Additional Commissioner of Police, Administration Dr. Jalindar Supekar) यांनी दिली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने (Swatantryacha Amrut Mahotsav) आयोजित करण्यात आलेल्या दौडमध्ये पोलीस घटकातील सीआयडी (CID), डॉग स्कॉड (Dog Scod) इत्यादींचा समावेश असणार आहे. दौडमध्ये पुणे शहरातील एकूण 600 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होणार आहेत. या दौडचे आयोजन करण्यासाठी शहरातील ब्ल्यु ब्रिगेड (Blue Brigade) या आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या पथकाचे प्रमुख अजय देसाई (Ajay Desai) व त्यांची टीम समन्वयक व 50 स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) हे प्रायोजक असणार आहेत.
दौडमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी टि शर्ट, नाश्ता, मेडल, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत पहिल्या तीन स्पर्धकांना (पुरुष व महिला गट) सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तसेच सकोनि व गारमिन यां कंपन्यांकडून विशेष बक्षिस देण्यात येणार आहे.
दौडचा मार्ग कसा असेल ?
ही दौड पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथून सुरु होऊन कृषी महाविद्यालयाच्या गेटजवळील चौकातून यु टर्न घेऊन पुणे सिमला पौलीस चौक,
जंगली महाराज रोड वरुन संभाजी पुतळ्याजवळून वळून गुडलक चौक, हॉटेल रुपाली जवळील चौकातून बीएमसी रोड,
बीएमसी कॉलेज रोडवरुन सिम्बॉयसिस कॉलेज,
पत्रकार चौक त्यानंतर सेल पेट्रोलपंप येथून यु टर्न घेऊन परत त्याच रस्त्याने पोलीस मुख्यालय येथे परत आल्यानंतर ही दौड संपेल.
यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक विभाग यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी नेमबाज अंजली भागवत (Shooter Anjali Bhagwat) उपस्थित राहणार आहे.
या दौडचे उद्घाटन पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता होणार आहे.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
Web Title : – Swatantryacha Amrut Mahotsav | Pune City Police Commissionerate organized a run on the occasion of Amrit Mahotsav of Independence
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update