Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – Swati Deval | मध्यंतरी अभिनेत्री रूपाली भोसले ही रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिने चाहत्यांना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिली होती, तर आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परीची मामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे स्वाती देवलदेखील रुग्णालयात दाखल असून, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. याची माहिती तिने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. स्वातीने तिच्या खलनायकाच्या भूमिकेतूनदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याआधी स्वाती अनेक मालिकांमध्येदेखील दिसली होती. सध्या स्वातीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Swati Deval)

स्वातीने तिचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “नमस्कार मित्रांनो कालच माझी छोटीशी सर्जरी झाली. स्वामींच्या कृपेने आता मी ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बळ मिळते. मी तुमच्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छिते की, तुमच्या शरीराकडे जास्त लक्ष द्या. जरा जरी काही जाणवले तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपले शरीरच आपली खरी धन संपत्ती आहे. रोजच्या रोज पौष्टिक सकस आहाराचीदेखील शरीराला गरज आहे. सुरुवातीच्या काळात जंक फूड म्हणजे रविवारी आईने घरी बनवलेले पदार्थ असायचे. मात्र आता मित्रांबरोबर बाहेर जाऊन खायची आपल्याला सवयच लागली आहे. मी मात्र शूटवर असतानादेखील स्वतःचा डबा घेऊन जायचे. मी खूप फुडी असल्यामुळे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील पदार्थ मी आवडीने खाते. मात्र, तिथल्या शेफला भेटून त्याची रेसिपीदेखील जाणून घेते. ही माझी एक सवय झाली आहे आणि घरी येऊन तो पदार्थ मी स्वतः बनवून खाते”. (Swati Deval)

स्वातीने म्हटले की, “नुकतीच माझी मैत्रीण रूपालीदेखील रुग्णालयात दाखल होती. तिने केलेली पोस्ट मी वाचली आणि मला धैर्य मिळाले. माझ्या या प्रवासात माझा नवरा तुषारनेदेखील माझी मदत वेळोवेळी केली आहे.
पेच बनवून ती भरवण्यापासून ते पाय दाबून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तो करून द्यायचा. लव्ह यू तुष्की”.
सध्या स्वातीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर तिच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा
सल्ला दिला आहे. त्याचबरोबर स्वातीने तिच्या पोस्टमध्ये तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्स यांचेदेखील
आभार मानले आहे. स्वाती लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा एकदा मालिकेत रुजू होण्यासाठी चाहते तिची वाट
पाहत आहेत. स्वाती देवलनं कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फू बाई फू, पुढचं पाऊल
यांसह अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Web Title :-  Swati Deval | mazhi tuzhi reshimgaath fame actress swati deval hospitalized undergoes small surgery shared post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | मुख्यमंत्री शिंदे यांनी उरुळी देवाची-फुरसुंगीचे केले राजकीय ‘ऑपरेशन’ ! सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना आयुष्यभर सोसाव्या लागणार वेदना?

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया