दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवालांचा पती नवीन जयहिंदशी ‘घटस्फोट’, ट्विट करून म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आता विवाहित राहिल्या नाहीत. त्यांचा पती नवीन जयहिंद यांच्याशी घटस्फोट झाला आहे. बुधवारी ट्विट करून त्यांनी स्वता ही माहिती दिली. स्वाती यांनी म्हटले की, त्यांचे परीच्या गोष्टींचे दिवस संपले आहेत. अनेकदा चांगले लोकसुद्धा सोबत राहू शकत नाहीत. त्यांनी म्हटले आहे की, पतीची त्यांना नेहमी आठवण राहिल.


स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले आहे की, सर्वात वेदनादायी क्षण तेव्हा असतो जेव्हा तुमची गोष्ट समाप्त होते. माझा आणि नवीन (नवीन जयहिंद) चा घटस्फोट झाला आहे. कधी-कधी सर्वात चांगले लोकसुद्धा सोबत राहू शकत नाहीत. मला नेहमी त्यांची आठवण येईल. मी देवाला प्रार्थना करते की आम्ही आणि आमच्यासारख्या अन्य लोकांना या वेदनेपासून सुटका मिळण्यासाठी शक्ती द्यावी.

स्वाती मालीवाल यांचे पती नवीन जयहिंद आम आदमी पार्टीशी संबंधित आहेत. 2015 मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर स्वाती मालीवाल यांना दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. स्वाती मालीवाल नेहमी त्यांच्या कामामुळे चर्चेत होत्या. मुलींवर बलात्कार करणार्‍यांना फाशी देण्याच्या मागणीवरून त्यांनी मागील डिसेंबर महिन्यात आमरण उपोषण केले होते. परंतु काही दिवसानंतर त्यांची प्रकती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

…तेव्हा पतीने असे केले होते कौतूक
जेव्हा स्वाती यांनी उपोषण केले तेव्हा नवीन जयहिंद यांनी पत्नीला शेरनी आणि मर्दानी अशी उपमा देऊन कौतूक केले होते. त्यांनी लिहिले होते की, स्वाती शेरनी है मुर्दा नहीम मर्दानी है. सोये हुए लोगों को जगाया जाता है, पर मुर्दों को जगाने चली है. इस जंगल मे जंग जिंदा रहकर लडी जाती है, मरके तो जंग नहीं लड़ी जा सकती. रेपिस्टों को फांसी के लिए अनशन पर है. मर भी जाएगी तो यह लोग याद भी नहीं रखेंगे.