Photo Story : पुण्याच्या स्वाती सराफ ‘मिस अँड मिसेज इंडिया युनिव्हर्स क्लासिक 2019’ सौंदर्य स्पर्धेत विजयी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमानारा दि फर्न येथे ‘जाझ मॅट्स’ या नामांकित इव्हेन्ट मँनेजमेन्ट ग्रुपतर्फे 1 डिसेंबर रोजी ब्यूटी पेजन्ट सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संपूर्ण भारतातून एकूण 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत स्वाती सराफ विजेत्या झाल्या आहेत. या स्पर्धेत ज्युरींच्या एकमतानं स्वाती सराफ यांना मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक 2019 स्पर्धेच्या विजेत्या म्हणून घोषित केलं.

 

स्वाती सराफ यांच्याविषयी थोडक्यात…

स्वाती सराफ या पुण्यातील एफ 3 स्पोर्ट अकादमीच्या डायरेक्टर आहेत जी पीडीसीएशी संबंधित आहे. याशिवाय त्या स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, इमेज कंसल्टंट, फॅशन कोरियोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजस्थान असोसिएशनकडून अवॉर्डही मिळाला आहे. स्वाती सराफ या युथ ह्युमन राईट्स या एनजीओलाही सपोर्ट करतात. स्वाती सराफ या मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनलमध्येही सहभागी होणार आहेत.

स्वाती यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही…

स्वाती सराफ एफ 3 स्पोर्ट्स अकादमी यशस्वीपणे चालवत आहेत. पुणे, इंदोर आणि जयपूरमधील अनेक शाळांचाही यात समावेश आहे. त्या रणजी ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी उद्योगातील आयपीएल खेळाडूंशी संबंधित आहे. त्यांनी अभिजीत सराफशी लग्न केलं आहे. अभिजीत आणि स्वाती यांना 14 वर्षांचा मुलगा आहे. इशान असं त्याचं नाव आहे.

स्वाती यांचे आई-वडिल आणि शिक्षणाविषयी थोडक्यात…

स्वाती सराफ या मध्य प्रदेशातील प्रमोद कुमार गुप्ता आणि सुषमा गुप्ता यांची कन्या आहेत. त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या आईला दिलं. लहानपणापासूनच स्वाती यांना आपण ग्लॅमरच्या जगात असावं अशी इच्छा होती. लहान असताना त्या एक उत्तम खेळाडू होत्या. त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.आणि स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये त्यांनी स्पेशलायजेशन केलं आहे.

स्वाती सराफ समाजावर सकारात्मक छाप सोडतात

स्वाती सराफ समाजावर सकारात्मक छाप सोडण्याचा प्रयत्न करणारी एक महिला आहे. तिच्या डोक्यावरचा मुकुट त्यांच्या वैभवात आणि सौंदर्यात भर घालत आहे. त्यांच्या खेळाच्या शूजपासून तर त्यांच्या उंच टाचांच्या सँडल्सपर्यंतच्या प्रवासानंतर त्या धीटाईनं उभ्या आहेत आणि इतरांना प्रेरणा देत आहे.

 

 

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/