Swati Singh | UP मध्ये भाजपच्या बड्या नेत्याच्या संसारात वादळ ! राजकारणामुळे संसार मोडला, माजी महिला मंत्र्याचा विद्यामान आमदार पतीविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये भाजपला (Uttar Pradesh BJP) बहुमत मिळून आता सरकार स्थापन करण्याची वेळी आली असतानाच राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या संसारात वादळ आलं आहे. भाजप नेते आणि आमदार दयाशंकर सिंह (MLA Dayashankar Singh) यांना घटस्फोट (Divorce) देण्याचा निर्णय त्याची पत्नी आणि मावळत्या सरकारमधील मंत्री (Minister) स्वाती सिंह (Swati Singh) यांनी घेतला आहे. स्वाती सिंह (Swati Singh) यांनी घटस्फोट मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज (Application) दाखल केला आहे. पूर्वीपासून सुरु असलेला घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरु करण्यासाठी स्वाती सिंह यांनी फॅमिली कोर्टात (Family Court) अर्ज केला आहे.

 

2018 मध्ये केला होता अर्ज
स्वाती सिंह यांनी 2018 मध्येच घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. परंतु त्यावेळी दोन्ही पक्ष न्यायालयात हजर न राहिल्याने कोर्टाने ही केस बंद केली होती. परंतु आता स्वाती सिंह (Swati Singh) यांनी अ‍ॅडिशनल प्रिंसिपल जज (Additional Principal Judge) यांच्या कोर्टात पुन्हा ही केस सुरु करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर न्यायमूर्तींनी आपला निर्णय राखून ठेवला आहे.

 

उमेदवारी न मिळाल्याने वाद
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये (Uttar Pradesh Assembly Elections) स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यावेळी या पती-पत्नीनी सरोजिनी नगर मतदारसंघावर (Sarojini Nagar Constituency) दावा केला. परंतु पक्षाने दोघांनाही उमेदवारी नाकारून या मतदारसंघातून राजेश्वरी सिंह (Rajeshwari Singh) यांना उमेदवारी दिली. तेथून ते विजयी झाले. तर स्वाती सिंह यांचे पती दयाशंकर सिंह हे बलिया (Ballia Constituency) येथून विजयी झाले. मात्र, स्वाती सिंह यांना उमेदवारी मिळाली नाही.

सामान्य गृहिणी ते आमदार आणि मंत्री
उत्तर प्रदेशच्या राजकारणात सामान्य गृहिणी ते आमदार (MLA) आणि नंतर मंत्री असा स्वाती सिंह यांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावतींबाबत (BSP Chief Mayawati) अपशब्द उच्चारले होते. यानंतर संतापाची लाट उसळल्याने भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्याचवेळी नसीमुद्दीन सिद्दीकी (Naseemuddin Siddiqui) आणि बसपच्या नेत्यांनी स्वाती सिंह आणि त्यांच्या मुलीबाबत अक्षेपार्ह विधानं (Offensive Statement) केली होती. तेथून पेटून उठलेल्या स्वाती सिंह यांनी बसपा आणि मायावतींच्या विरोधात आघाडी उघडली. यानंतर भाजपने त्यांची थेट पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. तसेच त्यांना सरोजिनी नगर येथून उमेदवारी दिली. त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

 

दयाशंकर सिंह यांच्यासोबत संबंध बिघडले
यानंतर पती दयाशंकर सिंह आणि स्वाती सिंह यांच्यातील संबंध बिघडत गेले.
त्यांच्यातील संबंध बिघडल्याच्या बातम्या 2017 मध्ये येऊ लागल्या.
परंतु स्वाती सिंह या मंत्री बनल्यानंतर प्रकरण शांत झाले. स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठी आधीच अर्ज केला होता.
परंतु दोन्ही पक्ष कोर्टात हजर न राहिल्याने ही केस 2018 मध्ये बंद करण्यात आली.
आता ही केस पुन्हा सुरु करण्यासाठी स्वाती सिंह यांनी कोर्टात अर्ज केला आहे.

 

Web Title :- Swati Singh | politics broke the world swati singh decided to divorce her husband dayashankar singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fact Check – Aishwarya Rai Bachchan Kiss Photo | अभिषेकसमोरचं ऐश्वर्यानं केलं अजय देवगनला KISS, पाहा व्हायरल फोटो..

 

Nia Sharma Superbold Look | हाई स्लिट गाउन घालून निया शर्मा झाली प्रचंड बोल्ड, सोशल मीडियावर केल्या बोल्डनेसच्या हद्द पार

 

KL Rahul | ‘…म्हणून पंजाब किंग्ज सोडण्याचा निर्णय घेतला’; के. एल. राहुलने केला मोठा खुलासा!