रात्री झोपेत घाम येणे हे ‘या’ गंभीर आजरांचे लक्षण

पोलीसनाम ऑनलाइन पंखा, एसी असूनही रात्री झोपेत असताना घाम येत असल्यास हे गंभीर लक्षण आहे. असे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अति घाम येणे हे हायपर थारॉईयडीझम चेही लक्षण आहे. थायरॉईड ग्रंथी चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. या ग्रंथींनी जास्त हार्मोन्स तयार केल्यास शरीराचे तापमान वाढते. तसेच भूक आणि तहान लागते. नाडीचे ठोके वाढतात, थकवा जाणवतो, अतिसार होतो, वजनही कमी होते. लो ब्लड शुगर, स्लिप अ‍ॅप्निया, टीबी, मानसिक ताण, एचआयव्ही, ट्यूमर आदी आजारातही रात्री झोपेत घाम येण्याचे लक्षण दिसून येते.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन घेतल्याने रात्री हायपोग्लेसेमिया म्हणजे लो ब्लड शुगर  होऊन रक्तातील ग्लुकोज १४० मिलिपेक्षा कमी असेल, तर घाम येतो. सिल्प अ‍ॅप्निया असेल तर रात्री खूप वेळा श्वास बंद होतो. शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. वारंवार कुस बदलावी लागते. त्यामुळे घाम येतो. प्रोस्टेट कॅन्सर, किडनी कॅन्सर किंवा अंडाशय आणि अंडकोषात ट्युमर असल्यास रात्री घाम येतो. थायरॉईड कॅन्सर आणि पॅनक्रिझ कॅन्सरमध्येही असे होते. टीबीची लागण झाली असल्यास रात्री भरपूर प्रमाणात घाम येतो.

फुफ्फुसांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होत असते. खोकताना छातीत वेदना होतात. खोकताना रक्त बाहेर येते. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. भूक लागत नाही. मानसिक ताण असेल तर दिवसा घाम येतो, तसा रात्रीही येतो. वयोवृद्ध आणि लहान मुले रात्रीची घाबरतात. त्यामुळे त्यांना घाम येतो. एचआयव्हीचा संसर्ग झाला असल्यास लसिका ग्रंथींना सूज, ताप, सांधेदुखी ही लक्षणे दिसून येतात. एचआयव्ही असलेल्या १० पैकी एका रुग्णाला रात्री घाम येतो. वजन घटणे, अतिसार आणि आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घाम येणे अशी लक्षणं असतात.