नाकाबंदीत मोटारीने पोलीस उपनिरीक्षकाला नेले फरफटत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाकाबंदी केली असताना थांबण्याचा इशारा केल्यानंतरही न थांबता पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

अनिल नामदेव चव्हाण (वय ४०, रा. संस्कृती हाईटस, शिंदेवस्ती, रावेत) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय विष्णु जाधव (वय ५४, निगडी वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना निगडीतील टिळक चौकात सकाळी अकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निगडीतील टिळक चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. तेथे अनिल चव्हाण हे गाड्यांची तपासणी करीत होते. यावेळी स्वीफ्ट डिझायर कार आली. त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. तरीही त्याने कार न थांबविता चव्हाण यांच्या अंगावर गाडी घालून गाडीचा स्पीड कमी न करता त्यांना रोडने फरफटत नेले. त्यात ते किरकोळ जखमी झाले.

त्यानंतर गाडीतून खाली उतरुन अनिल चव्हाण याने तुम्ही माझीच गाडी का अडवली, असे म्हणून तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय. तुमची गुंडशाही चाललीय. मी आता लगेच आमची राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना बोलावतो. मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
निगडी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like