अन्नासाठी शेतकर्‍यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून; मिळालं जबरदस्त उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अन्नासाठी आपण शेतकर्‍यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो, असं म्हणणार्‍या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च वाया गेल्याचा खोचक टोला स्विगीने लगावलाय. सध्या स्विगीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तसेच स्विगीचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.

नवीन कृषी विधेयकांवर नाराजी व्यक्त करत आंदोलनामध्ये सक्रिय राहण्याची ठाम भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे 5व्या दिवशी शेतकर्‍यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पाहायला मिळतोय.

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येताहेत. अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणार्‍या ’स्विगी’ने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

सुमारे 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिपिएस्ट माईंड नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय. यात ट्विट करणार्‍या सोशल इन्फ्ल्युएन्सरने, शेतकरी आंदोलनासंदर्भात भक्त असणार्‍या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केलीय. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकर्‍यांवर अवलंबून नाही. आपण कधीही हवं ते अन्नपदार्थ स्विगीवरून मागवू शकतो, असं म्हटलंय. त्यानंतर तू जिंकला म्हणून विषय सोडून दिला, असा उल्लेख केलाय.

You might also like