‘Swiggy go’ सेवा सुरु ! तुम्ही घरी ‘विसरलेल्या’ वस्तू ‘इंस्टंट’ पोहोचवणार तुमच्यापर्यंत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फूड डिलीवरी सेवा देणाऱ्या स्विगीने (Swiggy) बुधवारपासून स्विगी गो (Swiggy go) ही सेवा लॉन्च केली आहे. ज्या आधारे संपूर्ण देशात इंस्टंट पिक अप आणि डिलीवरी करण्यात येईल. याअंतर्गत शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून आता खाद्यपदार्थांशिवाय लॉन्ड्रीचे प्रोडक्ट्स, घरी विसरलेले की-रिंग, फुले, भेटवस्तू इत्यादी वस्तूंची डिलीवरी देण्यात येईल. आता ही सेवा फक्त बंगळूरुमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, परंतू 2020 पर्यंत इतर 300 शहरात ही सेवा कंपनीकडून देण्यात येईल. ही सेवा स्विगी अ‍ॅपवरुनच देण्यात येईल.

स्विगी गो सेवा त्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल जे घाई घाईत एखाद्या वस्तू घरीच विसरुन जातात. या सेवेत विसरलेल्या वस्तू तुमच्या घरुन पिक करुन तुमच्यापर्यंत पोहचवल्या जातील. यात कागदपत्र, चावी, जेवनाचा डब्बा किंवा इतर गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल.

स्विगीचे CEO श्रीहर्ष मजेठी यांनी सांगितले की. 2020 पर्यंत ही सेवा 300 पेक्षा जास्त शहरात उपलब्ध करुन देण्यात येईल. स्विगी गो आणि स्टोअर्ससाठी सर्व डिलीवरी स्विगीच्या डिलीवरी फ्लीटद्वारे करण्यात येईल. यामुळे कंपनीच्या डिलीवरी पार्टनर्सला इनकमसाठी अधिक स्त्रोत उपलब्ध होतील.

स्विगी गो सेवेसाठी कंपनीने 300 पेक्षा जास्त मर्चेंटबरोबर भागीदारी केली आहे. स्विगी गो सेवेला नुकतेच नॅशनल रेस्टॉरेंट एसोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) च्या घोषणेनंतर हे लॉन्च करण्यात आले आहे. ज्यात एसोसिएशनने Swiggy, Zomato, Uber Eats, Food Panda सारख्या डिलीवरी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या डिस्काऊंटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. एसोसिएशनने यूजर्ससाठी खाद्यपदार्थांच्या किंमतीच्या ट्रांसपरंसी ठेवण्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –