Swiggy Instamart चे आकडे, मागील एक वर्षात मुंबईकरांनी ऑर्डर केले 570 पट जास्त कंडोम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Swiggy Instamart | सध्या देशात लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करत आहेत. ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्म (Grocery Service Platforms) च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू लोकांच्या घरापर्यंत सहज पोहोचत आहेत. भाज्यांपासून औषधांपर्यंत, स्मार्टफोनवर (Smartphone) काही क्लिक करताच लोकांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, Swiggy Instamart ने जून 2021 ते जून 2022 दरम्यान 90 लाखापेक्षा जास्त यूजर्सला सर्व्हिस दिली आहे. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या (Bangalore) महानगरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत. (Swiggy Instamart)

 

हेल्थकेअर प्रॉडक्टसाठी ऑर्डर

ग्राहक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म (Online Shopping Platforms) च्या माध्यमातून मेडिकल संबंधित गोष्टीही ऑर्डर करत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, गेल्या 12 महिन्यांत मुंबईकरांनी 570 पट जास्त कंडोम (Condoms) मागवले आहेत. त्याच वेळी, 2021 मध्ये, Instamart ला सुमारे 20 लाख सॅनिटरी नॅपकिन्स (Sanitary napkins), मेन्स्ट्रूअल कप आणि टॅम्पॉनच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. याशिवाय ग्रोसरीच्या वस्तूंच्याही भरपूर ऑर्डर मिळाल्या आहेत. (Swiggy Instamart)

 

नूडल्सच्या 56 लाख पाकिटांची ऑर्डर

सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान या मेट्रो शहरांमध्ये आइस्क्रीमच्या (Ice cream) मागणीत 42 टक्क्यांनी वाढ झाली होती. बहुतांश ऑर्डर रात्री 10 नंतर दिल्या गेल्याचेही समजते. मेट्रो शहरांमध्ये लोकांनी इन्स्टंट नूडल्सच्या 5.6 दशलक्ष पॅकेट ऑर्डर केली. हैद्राबादमध्ये, यूजर्सनी उन्हाळ्याच्या महिन्यांत सुमारे 27,000 फ्रेश ज्यूसच्या बाटल्या मागवल्या.

 

60 लाख अंड्यांची मिळाली ऑर्डर

गेल्या दोन वर्षांत अंड्यांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबईसह मेट्रो शहरांमध्ये (Metro City) राहणार्‍या लोकांनी गेल्या एका वर्षात सरासरी 60 लाख अंडी ऑर्डर (Egg order) केली. रिपोर्टनुसार, बेंगळुरू आणि हैद्राबादमधील ग्राहकांनी नाश्त्यासाठी जास्तीत जास्त अंडी ऑर्डर केली. त्याचवेळी, मुंबई, जयपूर (Jaipur) आणि कोईम्बतूरच्या लोकांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी जास्तीत जास्त अंडी ऑनलाइन ऑर्डर केली आहेत.

 

डेअरी प्रॉडक्टची मागणी

चहा आणि कॉफी (Tea and coffee) या दोन्हींच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, मागणीत 2,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी दुधासाठी 3 कोटी ऑर्डर्स आल्या आहेत. बंगळुरू आणि मुंबईतील लोकांनी सकाळी जास्त ऑर्डर दिल्या आहेत. रेग्यूलर मिल्क , फुल क्रीम मिल्क आणि टोन्ड मिल्क हे सर्वात जास्त ऑर्डर केलेले डेअरी प्रॉडक्ट आहेत.

 

फळे आणि भाज्यांची ऑर्डर

गेल्या वर्षभरात 62 हजार टन फळे आणि भाजीपाल्याची ऑर्डर मिळाली आहे.
12,000 ऑर्डरसह, बेंगळुरू ऑर्गेनिक प्रॉडक्टच्या (Organic product) खरेदीदारांच्या यादीत अग्रस्थानी आहे.
त्याच वेळी, हैद्राबाद आणि बंगळुरू यांनी मिळून 12 महिन्यांत 290 टनांहून जास्त हिरव्या मिरचीची ऑर्डर दिली आहे.
गेल्या एका वर्षात बाथरूम क्लीनर, स्क्रब पॅड, ड्रेन क्लीनर आणि इतरसाठी 2 लाखांहून जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत.

 

Web Title : –  Swiggy Instamart | mumbai ordered maximum number of condoms in last year swiggy survey reveals know the details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा