विहिरीत पोहायला गेल्याच्या कारणावरुन अमानुष मारहाण, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

जळगाव :पोलीसनामा ऑनलाईन

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात पोहण्यासाठी तीन मुले गावातीलच एका विहिरीवर गेली होती. ती विहीर गावातील जोशी नामक एका व्यक्तीची होती. विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. इतकेच नाही, तर त्यांची गावात धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. जळगावातील या घटनेमुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जातीपातीची पाळेमुळे अजूनही किती खोलवर रुजली आहेत याचे हे विदारक आणि सुन्न करणारे हे उदाहरण आहे. विहिरीचा मालक जोशी याच्यावर मारहाण प्रकरणी तसेच आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. यात महत्वाची बाब म्हणजे ‘आम्हाला या गावात राहायचे आहे’ असे सांगत पीडितांच्या कुटुंबीयांनीही तक्रार नोंदवण्याबाबत टाळाटाळ केल्याचे म्हटले जात आहे.या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.

राज्यभरातून येत आहेत संतप्त प्रतिक्रिया

या घटनेमुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा निषेध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील दर्शवला आहे. त्यांनी आपल्या ट्विट या घाटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले….

दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री

मानवतेला काळिमा फासणारी घटना – जिग्नेश मेवानी, दलित नेते

मानसिक विकृतीतून कृत्य – एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते

 

 

 

 

 

You might also like