पुणे : जिम ट्रेनरचा तलावात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

सहकारनगर येथील महापालिकेच्या जलतरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेल्यानंतर २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. सुरज शरद गायकवाड (28, बिबवेवाडी अप्पर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरज शरद गायकवाड हा जिम ट्रेनर होता.

[amazon_link asins=’B0784SX2SP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c3a646d-8349-11e8-add7-d3a910aa0778′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड हा 8 वर्षांपासून जीन ट्रेनचे काम करतो. रविवारी सकाळी तो तळजाई येथे धावायला गेला होता. त्यानंतर ८ वाजता मित्रांसोबत सहकारनगर येथील जलतरण तलावात पोहायला आला. मित्रांसोबत तो पाण्यात उतरला. पोहत असताना अचानक तो बुडत असल्याचे तेथील प्रशिक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी त्याला बाहेर काढून प्रथमोपचार केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केली. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. पोटकुले यांनी दिली.