“स्वाइन फ्लू’चा विळखा कायम

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन 

परतीचा पाऊस, दुपारचे कडकडीत ऊन, सकाळी पडणारी थंडी यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. जिल्ह्यात 26 संशयित रूग्णांवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पाच नवे संशयित दाखल झाले आहे. “स्वॅब’चे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पाच रूग्णांचे पॉझिटीव्ह अहवाल आले असून चार जणांवर खासगी, तर एका रूग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9734db05-c26c-11e8-9b79-5351b28d3563′]

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा कायम आहे. वातावरणातील बदलामुळे संसर्ग झापाट्याने वाढत चालला आहे. जिल्ह्यात दहा जणांचा बळी गेला आहे. रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून संशयित रूग्णांची संख्या आता पंचवीसवर गेली आहे. आज नव्याने पाच संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. त्यात एरंडोली, कवठेमहांकाळ, मिरज आणि मालगाव परिसरातील रूग्ण आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a930dbe6-c26f-11e8-9c0e-0b1dd7b6e4f3′]

पुणे : ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचे निधन

त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, पाच रूग्णांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून उपचार सुरू आहेत. चार जणांवर खासगी, तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताप, सर्दी, खोकला याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही शासकीय रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.