चीनमध्ये आढळला महामारी पसरविणारा नवीन ‘Swine Flu’, बनु शकतो नवं संकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या एका सायंटिस्ट जनरलच्या एका अहवालानुसार चीनमधील संशोधकांना एक नवीन प्रकारचा स्वाइन फ्लू सापडला आहे, ज्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याला G4 असे नाव देण्यात आले आहे आणि आनुवांशिकदृष्ट्या हे H1N1 चे स्वरूप आहे, ज्यामुळे 2009 मध्ये भीती पसरली होती. चीनी विद्यापीठ आणि चीनचे रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रातील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यात मनुष्यांना संक्रमित करण्याची सर्व आवश्यक लक्षणे आहेत.

वैज्ञानिकांना ‘या’ गोष्टीची भीती !
ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात, अशी भीती संशोधकानीं व्यक्त केली आहे, अश्या परिस्थिती हे मोठ्या साथीचे रूप घेण्यास सक्षम आहे. G4 EA H1N1 या नवीन विषाणूत क्षमता आहे कि, ते आपल्या सेल्स अनेक पटींनी वाढवू शकतो. यावेळी उपस्थित H1N1 लससुद्धा या विषाणूवर प्रभावी नाही.

व्हायरसकडे दुर्लक्ष करू शकत नाही
दरम्यान, विषाणूचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या विषाणूपासून होणारा धोका फारसा नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संशोधकांनी फेरेट्सवर अनेक प्रयोग केले, जे फ्लूच्या संशोधनात वापरले जातात, त्यांना मानवांसारखी लक्षणे आढळतात, विशेषत: ताप, खोकला आणि शिंका. जी 4 हा अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे, मानवी पेशींसारखा प्रतिसाद देणाऱ्या फोरॉस्टमध्ये याची अधिक गंभीर लक्षणे दिसून आली.