केडगावमध्ये आढळला स्वाइन फ्लू सदृश संशयित रुग्ण

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

अब्बास शेख

दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण (आंबेगाव) परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे  आढळून आली असून या रुग्णावर सध्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

हवामानातील बदल व दमट हवामान असल्याने सध्या स्वाइन फ्लू या संसर्गजन्य रोगास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
शहरी भागासह आता ग्रामीण भागातही स्वाइन फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
[amazon_link asins=’B078124279,B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0290e9c5-bcf9-11e8-a4da-5db63a5885d6′]

केडगाव येथील रहिवाशी असलेली ती व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. मागील काही दिवसांपूर्वी या व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसून आल्यानंतर त्यास त्वरित लोणीकळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या त्या रुग्णावर  अतिदक्षता विभागात  स्वाइन फ्लू वरील टॅमि फ्लू व इतर औषधे सुरू करण्यात आली आहेत.

त्या रुग्णास प्रथम दर्शनी स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसत असली तरी संपूर्ण वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट) आल्यानंतरच त्या रुग्णास स्वाइन फ्लू झाला आहे कि अन्य काही हे कळू शकेल अशी  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रणवीर व यवत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. इरवाडकर यांनी बोलताना दिली आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी स्वाइन फ्लू बाबत ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे असून नागरिकांनी हि लक्षणे आढळल्यास जवळील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी संपर्क करावा, असे अवाहन केले आहे. तर स्वाइन फ्लू पासून बचावासाठी खालील उपाय करावे असे आवाहन त्यांनी केले आहे..
[amazon_link asins=’B07CRCPM4T,B01N407G2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09a1149f-bcf9-11e8-afdd-35dd321d6116′]

१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत.

११. तोंडावर मास्क लावावा.