प्रेमासाठी वाटेल ते ! उच्चशिक्षीत पती, 5 वर्षाचा मुलगा असताना देखील प्रियकरासाठी तिने ‘हे’ पाऊल उचलले

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रेयसीचे प्रियकराबरोबर पलायन किंवा विवाहिता प्रियकराबरोबर फरार यांसारख्या गोष्टी आपण ऐकत असतो मात्र कणकवलीत लग्नाअगोदरच्या प्रियकरासाठी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून दिल्याची घटना घडली आहे.

सिंधुदुर्गातील कणकवली येतेच राहणारी हि विवाहिता आपला इंजिनिअर नवरा आणि पाच वर्षांचा मुलगा असताना आणि स्वतः उच्चशिक्षित असताना पळून गेल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील या विवाहितेचे सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागातील एका क्रिकेटर मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलीचा घरच्यांनी दुसऱ्या मुलाबरोबर विवाह करून दिला. मात्र लग्नाच्या ६ वर्षांनंतर देखील तिचे संसारात मन रमत नव्हते.

या काळात तिला मुलगा देखील झाला, मात्र तिचे प्रियंकाराबरोबरचे संबंध सुरूच होते, त्यामुळे तिने शेवटी नवऱ्याला सोडून प्रियकराबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्या प्रियकराला भेटण्यासाठी ती कणकवली मध्ये आली. त्या प्रियकराचा फोन बंद असल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पोलिसांनी त्या प्रियकराला आणि महिलेच्या घरच्यांना आणि पतीला बोलावून घेतले.

दरम्यान, यानंतर देखील ती आपल्या पतीबरोबर जाण्यास तयार नव्हती, पोलिसांनी आणि घरच्या मंडळींनी तिची समजूत काढली मात्र तिने आपला निर्णय पक्का केला असल्याने ती प्रियकराबरोबर जाण्यास ठाम होती. बिचारा पती मात्र फक्त बघण्याचे आणि ऐकण्याचे काम करत होता. तो या प्रकरणात काहीही करू शकला नाही.

आरोग्य विषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही