स्विस बँक आज करणार मोठा खुलासा ; भारताला मिळणार काळा पैसा साठवणाऱ्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काळ्या पैशाबाबत मोदी सरकार संवेदनशील असल्याचे सातत्याने दिसून येते. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही भाजपाने कला पैसा भारतात परत आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार गेल्या ५ वर्षात मोदी सरकारने काळा पैसा कमी करण्यासाठी नोटाबंदी आणि बेनामी मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आता सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात काळ्या पैशाबाबत आलेल्या बातम्यांनी नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. उद्या स्विस बँकेत बँक खाती असणार्‍या भारतीयांचा पर्दाफाश होणार आहे. उद्यापासून स्वित्झर्लंडमध्ये बँक खाती असलेल्या भारतीय नागरिकांची माहिती कर अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असणार आहे.

हे पाऊल उचलतांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले की, “काळ्या पैशाविरूद्ध सरकारचा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि स्विस बँकांच्या गोपनीयतेचा युग अखेर सप्टेंबरपासून संपुष्टात येईल.” सीबीडीटी आयकर विभागासाठी धोरण तयार करते. त्याचबरोबर सीबीडीटीने म्हटले आहे की, २०१८ मध्ये स्वित्झर्लंडमधील स्विस बँकेतील बंद झालेल्या भारतीय नागरिकांच्या खात्यांची माहितीही भारताला मिळेल.

सीबीडीटीचे म्हणणे आहे की ही माहिती विनिमय प्रणाली सुरू होण्याच्या अगोदर भारतातील स्वीस प्रतिनिधींनी महसूल सचिव एबी पांडे, मंडळाचे अध्यक्ष पी.सी. मोदी आणि बोर्डाचे सदस्य (विधिमंडळ) अखिलेश रंजन यांची भेट घेतली. २९-३० ऑगस्टला आलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वित्झर्लंडच्या आंतरराष्ट्रीय वित्तव्यवहार विषयक राज्य सचिवालयातील कर विभागाचे उपप्रमुख निकोलस मारिओ यांनी केले.

स्विस बँकेत किती काळा पैसा :
यावर्षी अर्थविषयक स्थायी समितीचा अहवाल जूनमध्ये लोकसभेत सादर करण्यात आला. यानुसार १९८० ते २०१० दरम्यानच्या ३० वर्षांच्या काळात, भारतीयांमार्फत सुमारे २४६.४८ अब्ज डॉलर म्हणजेच १७,२५,३०० कोटी ते ४९० अब्ज डॉलर म्हणजेच ३४,३०,००० कोटी एवढा काळा पैसा भारताबाहेर पाठवला गेला.

आरोग्यविषयक वृत्त –