‘स्विर्त्झलँड’च्या हॉटेलने भारतीयांसाठी केली ‘वर्तवणुकी’ची नियमावली ; हर्ष गोयंकांचा आक्षेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्विर्त्झलँडच्या जीस्टैड हॉटेलने भारतीय नागरिकांसाठी एक नियम आणि कायद्याने राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. ज्याचे पालक करत त्यांनी हॉटेलमध्ये सुट्ट्यांचा आंनद घ्यायचा आहे. यावर आरपीजी ग्रुपचे चेयरमॅन गोयंका यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच या हॉटेलच्या निर्णयावर टीकाही केली आहे. त्यांनी त्यांचे मत ट्वीटरवरून व्यक्त केले आहे.

भारतीय नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या नियमावलीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर निर्बंध लावले गेले आहेत. हॉटेल मॅनेजर क्रिस्टीन मैट्टी यांनी ही लिस्ट जारी केली आहे. यात भारतीय पाहुण्यांनी नाश्ता केल्यावर टेबलवरील कोणत्याही गोष्टी उचलून जाऊ नये, तेथेच बसून खावे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. येथील जेवण हे केवळ नाश्त्यासाठी असून आपल्याला दुपारचे जेवण हवे असल्यास त्यासाठी पैसे मोजून स्टाफला सांगावे. तसंच इतर देशांचे आलेले पाहुण्यांना बुफे जेवणाच्या प्रकराचा आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे भारतीयांनी तेथे उपस्थीत असलेल्या भांड्यांचाच वापर करावा, असे विचित्र नियम या पत्रात लिहीले आहेत.

तसंच, भारतीयांनी आवाज करू नये. तुमच्याशिवाय हॉटेलमध्ये इतरही लोक असतात. त्यांना शांतता लागते. त्यामुळे कॉरिडोरमध्ये शांतता ठेवावी तर बालकनीतही मोठ्याने अरडा ओरड करू नये, असेही नियम आहेत.

दरम्यान, या सर्व नियमावलीवर गोयंका यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच या नोटीसमधून भारतीयांचा अपमान केल्याचे त्यांनी सांगितले असून या नोटीशीचा विरोध केला आहे. या नोटीशीवरून असंच सांगण्यात येत आहे की भारतीय लोक मोठ्याने बोलतात. तसंच भारतीय हे असभ्य आहेत, असंच दिसत आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या वर्तवणुकीत बदल करावा असं सांगितलं आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या व्यक्तीमत्त्व सुधारण्याबाबत त्यांनी आवाहन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –