नीरव मोदीची स्वित्झर्लंडमधील १६ लाख डॉलरची संपत्‍ती सीलबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणात नीरव मोदी आणि त्याची बहीण पुर्वी मोदी यांच्याशी संबंधित बँक खाती स्वित्झर्लंड मध्ये सील करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर स्वित्झर्लंडमधील तब्बल ६० लाख अमेरिकी डॉलरची संपत्ती देखील सील करण्यात आली आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांना मिळालेले ही दुसरे यश आहे. बुधवारी याच प्रकरणातील दुसरा आरोपी मेहुल चौक्सी याला भारतला प्रत्यर्पण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मेहुल चौक्सीला नागरिकत्व मिळालेल्या एंटीगुआ देशाने मेहुल चौक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा निर्णय एंंटीगुआच्या पंतप्रधानांनी आपल्या माहितीत दिला.

यातच आता नीरव मोदी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. तर त्याने आतापर्यंत लंडनच्या न्यायालयात ४ वेळा जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे, परंतू त्यात त्याला यश आले नाही. लंडन कोर्टाने कायमच त्याच्या याचिकेला फेटाळले आहे.

फेब्रुवारी २०१८ ला जेव्हा PNB घोटळा देशाच्या समोर आला तेव्हा नीरव मोदी फरार झाला होता आणि सुरक्षा यंत्रणा त्याचा तपास करत होती, तेव्हापासून देशातील त्याची करोडो रुपयांची संपत्ती बँकेने ताब्यात घेतली आहे. परंतू आता त्याच्या विदेशातील संपत्ती ताब्यात घेण्यात मोठे यश आले आहे.