स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये पाकिस्तान विरोधी पोस्टर, बलुचिस्तानातील नरसंहाराचा ‘उल्लेख’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे पाकिस्तानविरूद्ध पोस्टर लावले गेले आहेत. ‘पाकिस्तानातील नरसंहार’ हायलाइट करणारी पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात आली आहेत. जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) कार्यालय आहे. आजकाल येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचे 42 वे अधिवेशन चालू आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या अधिवेशनात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यासंदर्भात भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

Image

पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बलुचिस्तानमधील लोकांनीही यूएन मानवाधिकार परिषदेसमोर या भागात पाकिस्तानी सैन्याच्या ‘अत्याचार’ ठळकपणे मांडला होता. ज्येष्ठ बलुच कार्यकर्ते करीमा बलोच यांनी मार्चमध्येच या फोरमवरून खुलासा केला होता की पाकिस्तानी सैन्य अनेक दशकांपासून बलुच प्रांतात स्थानिकांची कत्तल करीत आहे.

Image

या संदर्भात जिनिव्हामध्ये पाकिस्तान विरोधात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आता पाकिस्तानचा खरा चेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Image

आरोग्यनामा ऑनलाइन –