सिव्हील हॉस्पिटलच्या वॉर्डबॉय कडुन तलवार जप्त

- पश्चिम देवपुर पोलीसांची कारवाई.

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन –  पश्चिम देवपूर पोलिसांनी लोकसभा निवड़णूकीच्या पार्श्वभूमीवर शासकिय रुग्णालयातील वॉर्डबॉयच्या घरातून तलवार जप्त केली आहे.

गोविंदा काशीनाथ वाणी. (व्यवसाय वॉर्डबॉय ,सिव्हील हॉस्पिटल,धुळे,मुळ रा.कापडणे,ह.मु.नगावबारी ) असे त्याचे नाव आहे.

सविस्ञ माहिती कि.पश्चिम देवपुर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार एक पोलीस  पथक तयार करुन संबंधीत संशयिताचे घरावर रात्री छापा टाकुन त्याला अगोदर चौकशी केली. तेव्हा तो उडावा उडवीची उत्तरे देत होता. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा खोलीत लपवलेली तलवार व मुठ त्याचे कडुन ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणुन गजाआड केले. शस्ञ बाळगल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पश्चिम देवपुर पोलीस करत आहे.

Loading...
You might also like