अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘मोगरा फुलला’ तर अभिनेत्री तापसीचा पन्नूचा ‘गेम ओव्हर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा गेम ओव्हर हा सिनेमा गेल्या शुक्रवारी रिलीज झाला होता. याच दिवशी मराठमोळ्या स्वप्नील जोशी आणि नीना कुळकर्णी प्रमुख भूमिकेत असलेला मोगरा फुलला हा सिनेमा रिलीज झाला होता. मोगरा फुलला या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांतच १.४ कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे तापसीच्या गेम ओव्हरने तीन दिवसांतच केवळ २ कोटींचा गल्ला जमवला. दोन्ही सिनेमांची कमाई पाहता मोगरा फुलला सिनेमा तापसीच्या हिंदी सिनेमाला टक्कर देतोय असे म्हणायला हरकत नाही. स्वप्नील जोशीच्या सिनेमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

स्वप्नीनच्या मोगरा फुलला या सिनेमाची विशेष बाब अशी की, रविवारी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच असूनही सिनेमानी दमदार कमाई केली आहे. मोगरा फुलला या सिनेमाच्या तीन दिवसांच्या कमाईचा आढावा घेतला तर, या सिनेमाने शुक्रवारी ३८ लाख, शनिवारी ५६ लाख आणि रविवारी मॅच असूनही ५२ लाखांची कमाई केली. तापसीच्या गेम ओव्हर सिनेमाबाबत सांगायचे झाले तर, शुक्रवारी या सिनेमाने ३८ लाख, शनिवारी ८८ लाख, तर रविवारी ७४ लाखांची कमाई केली.

आई-मुलगा यांच्यातील प्रेम आणि प्रेयसी-प्रियकर यांच्यातील प्रेमावर भाष्य करणारा मोगरा फुलला प्रेक्षकांना भावला आहे असे दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रावणी देवधर यांनी केले आहे. तर तापसीचा गेम ओव्हर हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू अशा तिनही भाषेत रिलीज झाला आहे. तिनही भाषेची एकूण कमाई ४.९५ कोटी इतकी झाली आहे.

सिनेजगत

सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची तारीख पुन्हा ‘चेंज’, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

Video : ‘दबंग’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ प्रचंड ‘व्हायरल’

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

You might also like