अहो आश्चर्यम,पेंग्विनमधील ३७७ सक्सेसफुल…! दिला पिलाला जन्म 

सिडनी : वृत्तसंस्था –  भारतात अगदी काही दिवसांपूर्वी समलैंगिक कायद्याला मान्यता देण्यात आली आहे. प्राण्यांना मात्र असे काही नियम नसतात ना कशाचे बंधन ना कुठल्या सीमा
आता हेच बघा ना ! ऑस्ट्रेलिया येथील सिडनीमध्ये असलेल्या मत्स्यालयात राहणाऱ्या स्फेन आणि मॅजिक या गे जोडप्याला पिल्लू  झाले आहे. हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहे.  हे जोडपं महिन्याभरापासून अंड उबवत होतं. अखेर या अंड्यातून चिमुकल्या पिल्लाचा जन्म झाला आहे. सिडनीच्या मत्सालयात जन्मलेले आणि गे पेंग्विनकडून उबवलेलं हे पहिलं अंटार्क्टिक पेंग्विनचं पिल्लू आहे. पिल्लाच्या जन्मानंतर सुरुवातीचे २० दिवस हे त्याच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे दिवस असतात. या काळात अनेक पिल्लं दगावतात. पण स्फेन आणि मॅजिकच्या पिल्लाची प्रकृती उत्तम उसून ते दोघंही त्याची विशेष काळजी घेत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर स्फेन आणि मॅजिक हे दोघंही जोड्यानं राहू लागले. अनेकदा पेंग्विन पक्षी आपल्या जोडीदाराला मागणी घालताना त्याच्यापुढे लहानसे खडे किंवा गुळगुळीत गोटे ठेवतात. हे खडे मादीनं चोचीत उचलले की पुढे नर- मादीची जोडी तयार होते. स्फेन आणि मॅजिक हे दोघंही अशाच पद्धतीनं एकत्र आले. त्यानंतर विणीचा हंगाम सुरू झाल्यावर इतर पेंग्विनच्या जोडीप्रमाणे दोघांनीही घरटं तयार करायला सुरूवात केली.
गे पेंग्विनच्या जोडप्यानं तयार केललं घरटं हे अन्य जोडप्यांच्या घरट्यापेक्षा खूपच मोठं होतं.  त्यामुळे मत्सालयातील अनेक कर्मचाऱ्यांना या दोघांबद्दल कुतूहल वाटू लागलं. त्यानंतर दोघांनाही मत्सालयातील कर्मचाऱ्यांनी खोटं अंड उबवण्यासाठी दिलं. या दोघांनीही त्या अंड्याची खूपच काळजी घेतली. नंतर स्फेन आणि मॅजिकला खरं अंड उबवण्यासाठी देण्यात आलं. १९ ऑक्टोबरला पिल्लाचा जन्म झाला. हे दोघंही अतिशय उत्तमरित्या आपल्या पिल्लाचं संगोपन करत असल्याचं मत्सालयाच्या कर्माचाऱ्यांनी सांगितलं.