अभिनेत्री तमन्ना भाटीयाला ‘गिफ्ट’ मिळाला जगातील 5वा सर्वात मोठा ‘डायमंड’ ! किंमत वाचून चकित ‘व्हाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साय रा नरसिम्हा रेड्डी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडला आहे असे दिसत आहे. या सिनेमात अभिनेत्री तमन्ना भाटीयाच्या अभिनयाची खूपच चर्चा होत आहे. सिनेमाचा प्रोड्युसर रामचरण याची पत्नी उपासना कोनीडेला देखील खूपच प्रभावित झाली आहे.

तमन्नावर इम्प्रेस होत उपासनाने तिला खूपच महाग गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट एक डायमंड रिंग आहे. उपासनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये उपसना म्हणते, “सुपर तमन्नासाठी मिसेज प्रोड्युसरकडून एक गिफ्ट. खूप मिस करत आहे. लवकर भेट.” उपासनाची ही पोस्ट तमन्नाने रिट्विट केली आहे.

तमन्ना किंवा उपासना यांच्यापैकी कोणीही या डायमंडची किंमत सांगितली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, तमन्नाला जो डायमंड दिला गेला आहे तो जगातील पाचवा सर्वात मोठा डायमंड आहे. जवळपास 2 कोटी किंमतीचा हा डायमंड आहे. हा डायमंड खूपच मोठा आहे.

 

Visit  :Policenama.com