Syed Mushtaq Ali Trophy | 4 चेंडू 4 विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेने केला विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) ट्वेंटी-20 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूने (Tamilnadu) हैदराबादवर विजय मिळवत सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तामिळनाडूने या (Syed Mushtaq Ali Trophy) सामन्यात ८ विकेट्सनी विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या एका सामन्यात विदर्भचा गोलंदाज दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) यानं मोठा विक्रम केला आहे. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात दर्शननं चार चेंडूंत चार विकेट्स घेताना लसिथ मलिंगा, राशिद खान आदी दिग्गजांच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकनं 7 बाद 176 धावा केल्या. विशेष म्हणजे त्यांच्या चार विकेट्स या अखेरच्या षटकात पडल्या. यामध्ये रोहन कदमनं 56 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह 87, तर कर्णधार मनिष पांडेनं 42 चेंडूंत 2 चौकार व 3 टकारांसह ५४ धावांची खेळी केली. तसेच अभिनव मनोहरनं 27 धावा केल्या आहेत. दर्शननं 20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनिरुद्ध जोशी, तिसऱ्या चेंडूवर बीआर शरथ ,चौथ्या चेंडूवर जगदीशा सुचिथ व पाचव्या चेंडूवर अभिनव याची विकेट घेतली. हे चारही फलंदाज झेलबाद झाले.

मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) एकाच पर्वात एकाच संघाकडून दोनदा हॅटट्रिक नोंदवल्या गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याअगोदर अक्षय कार्नेवारनं (Akshay Carnevar) सिक्किमविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. मुश्ताक अली ट्रॉफीत चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा दर्शन हा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथूननं (Abhimanyu Mithun) 2019 च्या उपांत्य फेरीत हरयाणाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. या दोघांनीही 20व्या षटकात हा पराक्रम केला आहे.

 

4 चेंडू 4 विकेट्स घेणारे गोलंदाज

जिम अ‍ॅलेनबी – 2008

आंद्रे रसेल – 2013

अल-आमीन होसैन – 2013

राशिद खान – 2019

लसिथ मलिंगा – 2019

अभिमन्यू मिथून – 2019

शाहिन आफ्रिदी- 2020

कर्टीस कॅम्फेर – 2021

दर्शन नळकांडे – 2021

 

Web Title :- Syed Mushtaq Ali Trophy | syed mushtaq ali trophy 2021 22 darshan nalkande picks four wickets in four balls in semi final

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Avadhoot Gupte | विक्रम गोखलेंना समर्थन देणाऱ्या विधानावरुन अवधूत गुप्तेचा U-टर्न, म्हणाला-‘ते पटेलच असं…’

Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Safe Online Transactions | मोबाईलवर घेत असाल Loan तर जाणून घ्या काय आहेत धोके आणि कसा करावा त्यापासून ‘बचाव’; DoT ने जारी दिला ‘सल्ला’