12 वी नापास झाल्यानंतर बनला IAS, UPSC Prelims च्या वेळी ‘आत्मसात’ केली होती ‘ही’ युक्ती

मुंबई, पोलीसनामा ओनलाईन : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रहिवासी सय्यद रियाझ अहमद एका विषयात बारावीत नापास झाले होते. मात्र त्यांनतर त्यांनी आपल्या अभ्यासाचा मार्ग बदलत उत्तम प्रगती केली. ज्यानंतर त्यांनी एमपीएससीमध्ये सेकेंड रँक मिळविला आणि तो रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झाले. एवढेच नव्हे तर हि नोकरी करता करता त्यांनी UPSC परीक्षेत देखील यश मिळविले.

रियाज अहमद म्हणतात की, आता यूपीएससीच्या प्रिलिम्सच्या परीक्षेला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, मी त्या लोकांबद्दल समजून घेऊ शकतो जे पहिल्यांदा प्रिलिम्सला बसले आहेत. काय वाचावे आणि काय सोडावे, हे प्रश्न मलादेखील पडले होते, अश्या वेळी रिव्हिजन हा उत्तम पर्याय असतो. आपण आतापर्यंत केलेला संपूर्ण अभ्यासाची रिव्हिजन करा. या व्यतिरिक्त आपण ग्रुप डिस्कशनदेखील करू शकता. ही चर्चा फक्त यूपीएससी प्रश्नांवरच असावी.

दररोज मॉक टेस्ट द्या :
प्रिलिम्सच्या शेवटच्या क्षणाची तयारी करण्यासाठी दररोज मॉक टेस्ट देणे खूप महत्वाचे आहे. ही चाचणी देऊन, आपण उत्तर पत्रिकेशी जुळवून घेतले पाहिजे, असा सल्ला रियाझ यांनी दिला. तसेच तयारीच्या शेवटच्या दिवसात पुन्हा एकदा नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी सारख्या विषयांची रिव्हिजन करा. प्रिलिम्सची तयारी करण्यासाठी वेळ व्यवस्थापन देखील खूप महत्वाचे आहे. नवीन काहीही वाचण्यास टाळा. वर्तमानपत्र वाचण्याऐवजी आपण वर्तमानपत्रातून घेतलेल्या नोट्सची रिव्हिजन करा.

सय्यद रियाझ यांनी 2013 मध्ये पुणे येथे राहून यूपीएससीची तयार केली. रियाज म्हणतो की, मला या परीक्षांबद्दल काहीच माहित नव्हतं, 2014 साली पहिल्यांदा अटेंम्ट दिली पण अपयशी ठरलो. मग 2015 मध्ये मी जामियाच्या आयएएस अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 2015 मध्ये प्रीलिम्स दिली. तेव्हाही अपयश आले.

त्यांनतर मी स्वत: ची स्ट्रॅटेजी तयार केली ज्याला 123 असे नाव दिले. रियाझ पुढे सल्ला देत म्हंटले की, 1 ज्या प्रश्नांवर तुम्ही कॉन्फिडन्ट आहेत, ती आधी सोडवा. मग 2 मध्ये ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही संभ्रमित आहे ते सोडवा. मग 3 जे अजिबात येत नाहीत, त्यांना पूर्णपणे सोडून द्या. अशी स्ट्रॅटजी वापरात मीदेखील अभ्यास केला आणि परिश्रम घेत परीक्षा उत्तीर्ण केली.

You might also like