Symbiosis Law School | सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाकडून येरवडा कारागृहाला पुस्तके भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (Symbiosis International University) सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयात (Symbiosis Law School) स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या (Symbiosis Law School) वतीने येरवडा कारागृहाला (Yerawada Jail) पुस्तके भेट देण्यात आली.

 

यावेळी पुणे जिल्हा विधि प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत (Pratap Sawant), येरवडा कारागृहातील कारागृह अधिकारी सुषमा चव्हाण
(Sushma Chavan) व कीर्तिकर, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाचे  उपसंचालिका डॉ. अपराजिता मोहंती (Deputy Director Dr. Aparajita Mohanty),
डॉ. धनाजी जाधव,डॉ. शिरीष कुलकर्णी,डॉ. आशिष देशपांडे, प्राध्यापक योगेश घरगुती, प्राध्यापक संग्रामजित चव्हाण,
प्राध्यापक चैत्रली देशमुख, विद्यार्थी उपस्थित होते.

 

सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या कम्युनिटी लीगल केअर सेंटर मार्फत केंद्रीय कायदेशीर सहाय्य प्राधिकरणाच्या पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम घेण्यात आला.
सिम्बॉयसिसचे समाजाप्रति असणारी सामाजीक कामे, आज पर्यंत राबवलेले विविध उपक्रम, औरंगाबाद आणि सांगली या दोन महाविद्यालयांना देणगी स्वरुपात
देण्यात आलेली पुस्तके याबद्दल चर्चा झाली. डॉ. आशिष देशपांडे यांनी आभार मानले.

 

Web Title : Books donated to Yerawada Jail by Symbiosis Law School

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

YONO SBI Car Offers | कार खरेदीवर मिळवा 50,000 रुपयांपर्यंत फायदा; YONO SBI ची विशेष ऑफर

Coronavirus in Maharashtra | राज्यात रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 997 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल