‘तुळशी’च्या पानावर ‘ओम’ पाहून लोक म्हणाले ‘चमत्कार’, ‘दर्शना’साठी लागल्या रांगा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लुधियानातील साहनेवालमधील एका घरात असलेल्या तुलशीच्या दोन पानांवर ओम चिन्हं बनलं आहे. ही खबर परिसरात सर्वत्र पसरली आहे. आसपासच्या परिसरातील लोकं तुळशीचं दर्शन घेण्यासाठी येताना दिसत आहेत. दर्शनासाठी येणारे लोक तुळशीची पूजाही करत आहेत.

हनेवालचे रहिवासी राज कुमार सांगतात, त्यांच्या घरी ठाकुरजी विराजमान आहे. त्यामुळे ते आणि त्यांची पत्नी रोज ठाकुरजींची पूजा करतात. त्यांच्या घरी दोन तुळशीची रोपं आहेत. त्यांची पत्नी मानसी रोज त्यांची पूजा करते.

गुरुवारी सकाळी ते ठाकुरजींची पूजा करत होते. त्यांची पत्नी तुळशीची पूजा करताना पाणी घालण्यासाठी गेली तेव्हा पत्नीनं अचानक राज यांना आवाज दिला. त्यांना बाहेर यायला सांगितलं. बाहेर आल्यानंतर त्यांच्या पत्नीनं दाखवलं की, तुळशीच्या दोन पानांवर ओमचं चिन्हं दिसत होतं.

पाहता पाहता ही गोष्ट परिसरातील लोकांना समजली. यानंतर अनेक लोक हे पाहण्यासाठी गर्दी करू लागले. तुळस पाहण्यासाठी येणारे लोक त्याची पूजाही करू लागले.

Visit : Policenama.com