अंगावरून पांढरं पाणी जातंय ? असू शकतो गर्भाशयाचा कॅन्सर ! जाणून घ्या ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बदलत्या जीवनशैलीत महिलांना प्रायव्हेट पार्ट संबंधित अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. महिलांना होणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून कसं वाचता येईल याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

योनीतून होणारा स्त्राव (व्हजायनल डिस्चार्ज)
तारुण्यात मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यापैकीच एक आहे ती म्हणजे योनीतून होणारा स्त्राव. यालाच व्हजायनल डिस्चार्ज असंही म्हणतात. योनी मार्गात इंफेक्शन झालं तर प्रायव्हेट पार्ट्सच्या इतर भागांनाही त्रास होऊ शकतो. योनीतून होणारा स्त्राव तसं तर खूप सामान्य बाब आहे. योनी स्वच्छ ठेवण्यासाठीच हा स्त्राव होत असतो. काही वेळा हा स्त्राव पांढरा असतो. परंतु हे घातक सुध्दा असू शकतं.

असामान्य योनी स्त्राव
योनीतून होणारा स्त्राव काही वेळा ॲबनॉर्मलही असू शकतो. यामुळं योनीचा रंग बदलतो आणि अंग जड वाटायला सुरुवात होते. जर काही इंफेक्शन झालं असेल तर योनीतून बाहेर पडत असलेल्या स्त्रावाचाही रंग बदलू शकतो.

असू शकतो कॅन्सरचा धोका
जर योनी मार्गातून पांढरा स्त्राव होत असताना अवयवांना सूज असेल तर तुम्हाला काहीतरी गंभीर आजार असण्याची ही लक्षणं आहेत. पांढरं आणि अंगावरून जाणं अशा दोन्ही गोष्टींना काही महिला गांभीर्यानं घेत नाहीत. परंतु यामुळं गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच धोका असू शकतो.

काय आहेत लक्षणं ?
– योनीस्त्राव होत असताना प्रायव्हेट पार्टला खाज येणं
– पांढरा रंग असलेला जाडसर अशा स्त्राव होणं
– अवयवांना सूज येणं
– सतत लघवीला येणं
– लघवी करताना वेदना होणं

काय आहेत याची कारणं
– रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं
– फंगल इंफेक्शन होणं
– मधुमेह होणं

काय करावेत उपाय ?
1) प्रायव्हेट पार्ट स्वच्छ आणि कोरडे ठेववेत
2) शरीर संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा
3) डायबिटीज असेल तर शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवा
4) नियमित व्यायाम करा
5) कायम प्रसन्न रहाल याकडे लक्ष असू द्या

महिलांना या आजाराकडे दुर्लक्ष करणं महागातही पडू शकतं. कारण यामुळं गर्भाशयाचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. पांढरं पाणी आणि त्यामुळं होणाऱ्या त्रासानं अशक्तपणा जाणवायला सुरुवात होते. आळस येतो. त्यामुळं याकडे दुर्लक्ष करू नका. असं काही झालं तर लगेच डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.