Corornavirus : ब्रिटनहून पुण्यात परतलेल्या एका प्रवाशामध्ये आढळले नव्या ‘कोरोना’ची लक्षणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. हे सर्व रुग्ण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी सोमवारी (दि.4) वर्षा येथे कोरोना लसीकरमाबाबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी ब्रिटनहून राज्यात आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्तांशी चर्चा करुन त्यांना अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

 

नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले 8 प्रवासी सध्या संस्थात्मक विलगिकरणात असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांचा संपर्क कोणा कोणाशी आला ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्षा येथील बैठकीत दिली.