Symptoms Of Depression In Women | महिलांमधील ‘हे’ आहेत डिप्रेशनची लक्षणे; जराही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Symptoms Of Depression In Women | सध्याच्या धावपळीच्या जगात सामाजिक संवाद कमी होतो आहे. खरंतर सोशल मीडियाचे युग आल्याने प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. बहुतांश लोक तणाव, चिंता यामुळे त्रस्त झाले आहेत. ज्यामुळे अनेक माणसांच्यात गंभीर मानसिक स्वरुपाचे डिप्रेशन अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचे प्रमाण महिलांमध्ये (Symptoms Of Depression In Women) अधिक असल्याचे दिसते.

 

सध्याच्या जीवनशैलीत अनेक स्त्रिया नैराश्याने त्रस्त आहेत. मात्र, त्या नैराश्याने त्रस्त झाल्या आहेत. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (Physical And Mental Health) गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे अनेक तणाव, चिंता, काळजी (Stress, Anxiety, Care) आदी गोष्टीला त्रस्त असाल तर यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. या दरम्यान आता डिप्रेशनची लक्षणे काय आहेत. याबाबत जाणून घ्या. (Symptoms Of Depression In Women)

 

1. अनियमित मासिक पाळी (Irregular Menstruation) –
काही वेळा तणाव आणि नैराश्यामुळे काही महिलांना त्रास होतो. दीर्घकाळापर्यंत नैराश्याने ग्रासल्याने देखील अकाली रजोनिवृत्ती होऊ शकते. जर तुम्हाला दोन-तीन महिने मासिक पाळी (Menstruation) येत नसेल, रक्तस्त्राव कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भधारणेसह अनियमित मासिक पाळीची इतर अनेक कारणे असू शकतात.

 

2. निद्रानाश (Insomnia) –
रात्री झोप येत नाही? नैराश्याची समस्या असलेल्या लोकांमध्ये हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे. नैराश्यामुळे महिला रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. काही अभ्यासात असे समोर आले आहे की, झोप न येण्याची समस्या जास्त विचार करणे, चिंताग्रस्त प्रतिक्रिया, नैराश्य यांमुळे असू शकते. अशाही अनेक महिला किंवा पुरुष आहेत ज्यांना खूप झोप येते किंवा अजिबात झोप येत नाही.

 

3. सतत अपराधीपणाची भावना (Feeling Of Constant Guilt) –
अपराधीपणाची भावना (Feelings Of Guilt) हे देखील डिप्रेशनचे एक कारण असू शकते. लोकांना दोषी वाटू शकते कारण ते उदासीन आहेत किंवा ते घरी किंवा कामावर पुरेसे खरे उतरत नाही. कोणत्याही गोष्टीत आत्मविश्वास न वाटणे हे देखील डिप्रेशनचं लक्षण आहे.

4. सतत मरण्याचा विचार (Thought Of Constantly Dying) –
मी गेल्यानंतर किंवा माझ्या मृत्यूनंतर काय? हा विचार सतत सतावत असतो. डिप्रेशनमध्ये असलेला व्यक्ती या सगळ्याचा विचार करतो. माझ्या मृत्यूनंतर पुढे काय होणार? यासारखे प्रश्न सतत स्वतःला आणि जवळच्या व्यक्तीला विचारणं हे देखील डिप्रेशनचे लक्षणे आहे.

 

5. नैराश्य असूनही वेगळी ऊर्जा जाणवणे (Feeling Different Energy Despite Depression) –
नैराश्याने (Depression) ग्रासलेले लोक काहीतरी कठोर करण्याचा निर्णय घेतात, जसे की स्वतःला मारणे. मध्येच हे लोकं अधिक उत्साही होऊ शकतात. तसेच मध्येच या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा त्रास होऊ शकतं. चिंता आणि नैराश्य असोसिएशन ऑफ अमेरिका (ADAA) नुसार, हे बेपर्वा वर्तन म्हणून देखील अधोरेखित होऊ शकते – विशेषत: पुरुषांमध्ये – जसे की धोकादायक लैंगिक वर्तन, जास्त खर्च करणे किंवा अल्कोहोल किंवा ड्रग्स सारख्या पदार्थांचा गैरवापर करणे.

 

6. आवडत्या कामातील रस कमी होणे (Loss Of Interest In Favorite Work) –
तुम्ही यापूर्वी आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत रस कमी होणे. अगदी तुमच्या छंदांमधील तुमचे स्वारस्य कमी झाली असेल. तर हे स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. कमी बोलणे, एकटे राहणे आवडत असल्यास, कोणाला भेटावेसे वाटत नसेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

 

7. एकाग्रतेत अडचण (Difficulty Concentrating) –
नैराश्याच्या लक्षणांपैकी एक म्हणजे एकाग्रता. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात समस्या.
कारण नैराश्याने ग्रस्त लोक त्यांच्या स्वतःच्या जगात आणि त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टींमध्ये हरवून जातात.
यामुळे तुमच्या कामावर आणि खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो.

8. भूक न लागणे (Loss of Appetite) –
जर तुम्ही पूर्वी जो आहार घेत होतात. त्यापेक्षा कमी खात असाल.
किंवा तुमच्या आवडीचे जेवण असूनही तुमची इच्छा होत नसेल तर ही लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवं.
खाल्ल्याने तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. तुम्हाला अ‍ॅनिमियाचा त्रास होऊ शकतो. भूक न लागणे हे नैराश्याचे लक्षण आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Symptoms Of Depression In Women | 8 symptoms of depression that no women should ignore know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radish Health Benefits | जाणून घ्या पोटाचा त्रास टाळण्यासाठी मुळा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

 

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

 

Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर