‘ही’ असू शकतात Immunity System ‘कमजोर’ असण्याची लक्षणं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरमुळे डॉक्टरांकडून रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी सिस्टम वाढवण्याचा, ती मजबूत करण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना व्हायरसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे असे मत डॉक्टरांचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती केवळ सर्दी, खोकला यापासून वाचवत नाही तर हेपेटायटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असण्याची अनेक कारणं असू शकतात. आधीपासूनच असलेला एखादा आजार किंवा धुम्रपान, मद्यपानाची सवय, झोप पूर्ण न होणं, खाण्या-पिण्याची अयोग्य सवय यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. जाणून घ्या काही लक्षणं

सतत थकवा जाणवणं

झोप पूर्ण न होणं, तणाव, एनिमिया, अशी काही सतत थकवा जाणवण, सुस्ती असल्याचे कारण असू शकतं. जर याची कारणं माहित नसल्यास किंवा झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत असल्यास हे इम्युनिटी कमजोर असल्याचं लक्षण असू शकतं.

सतत संसर्ग होणं

सतत आजारी पडणं, सतत सर्दी-खोकल्याचा त्रास होणं, ताप येणं, घसा खराब होणं किंवा शरीरावर पुरळ-रॅशेस अशा समस्या असल्यास, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याची शक्यता असू शकते.

जखम लवकर बरी न होणं

जखम झाल्यास ती लवकर बरी होत नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं हेच त्यामागील मुख्य कारण ठरु शकतं.

व्हिटॅमिन डीची कमी

व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते. अनेकांमध्ये याची मोठी कमतरता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सतत थकवा, सुस्ती, निद्रानाश, नैराश्य आणि डार्क सर्कल्स हे देखील कमकुवत प्रतिकारशक्तीची लक्षणं आहेत.