Symptoms Of Protein Deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात ‘ही’ 5 लक्षणे, इग्नोर करण्याने वाढतात अडचणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Symptoms Of Protein Deficiency | प्रोटीन केवळ आपले स्नायू मजबूत करत नाहीत तर शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. प्रोटीन देखील अँटिबॉडीज (Antibodys) तयार करण्यास सुद्धा मदत करतात जे संसर्ग आणि रोगांशी लढण्याचे काम करते. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे (Symptoms Of Protein Deficiency) अनेक समस्या होऊ शकतो. शरीरात काही लक्षणे प्रोटीनची कमतरता दर्शवतात, जी समजून घेणे फार महत्वाचे आहे. (National Protein Day 2022)

 

प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Protein Deficiency)

1. अवयवांना सूज (Swelling of body part) –
शरीराच्या एखाद्या भागात सूज येऊ लागते, तेव्हा त्यास वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. डॉक्टर म्हणतात की, ह्यूमन सीरम अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे अवयवांमध्ये सूज येते, जे रक्त किंवा रक्ताच्या प्लाझ्माच्या द्रव भागातील प्रोटीन असते. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आल्यास दुर्लक्ष करू नका.

 

2. लिव्हरची समस्या (Liver problems) –
शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हरशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे लिव्हरला सूज, जखम किंवा लिव्हर निकामी होण्याची शक्यता वाढते. जे लोक लठ्ठ आहेत किंवा अति प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक आढळून येते.

 

3. त्वचा, केस आणि नखे (Skin, hair and nails) –
प्रोटीनच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवर, केसांवर आणि नखांवरही स्पष्टपणे दिसून येतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचेला तडे जाऊ लागतात. त्वचेवर लाल ठिपके किंवा डाग दिसू लागतात. केस कमजोर होऊन गळू लागतात. नखे पातळ शकतात आणि त्यांचा आकारही बिघडू शकतो.

4. कमजोर मांसपेशी (Weak muscles) –
मांसपेशी मजबूत बनवण्यात प्रोटीनची सर्वात जास्त भूमिका असते. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास,
शरीराच्या कार्यासाठी आणि आवश्यक उतींसाठी शरीर हाडांमधून प्रोटीन घेण्यास सुरुवात करते.
त्यामुळे स्नायू कमकुवत होण्यासोबतच हाडे तुटण्याचा धोका वाढतो.

 

5. संसर्गाचा धोका (Risk of infection) –
प्रोटीनेच्या कमतरतेचा इम्युनिटीवर वाईट परिणाम होतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे इम्युनिटी योग्यरित्या कार्य करू शकत नाही.
परिणामी, खराब इम्युनिटीमुळे रोगांचा धोका लक्षणीय वाढतो.
एका अभ्यासानुसार, वृद्ध लोकांमध्ये सलग 9 आठवडे प्रोटीनच्या कमतरतेमुळे इम्युनिटीवर वाईट परिणाम होतो.

 

Web Title :- Symptoms Of Protein Deficiency | national protein day 2022 5 symptoms or warnig sign of protein deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urfi Javed Topless Video | उर्फी जावेदचा टॉपलेस व्हिडिओ झाला व्हायरल, व्हिडिओ पाहून झाले घायाळ

 

Lopamudra Raut Bikini In Snowfall | बर्फात मायनस डिग्री टेंम्प्रेचरमध्ये केलं ‘या’ बिग बॉसच्या स्पर्धकाने फोटोशूट, कडकडती थंडी पाहून हादरले चाहते

 

Tina Datta Bold Photoshoot | बेडरूमची लाईट बंद करून ‘या’ अभिनेत्रीनं केलं बोल्ड फोटोशूट, फोटोनं सोशल मीडियावर लावली आग