‘सिकल सेल’ग्रस्त रुग्णांनी घ्यावी ‘ही’ खास काळजी ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सिकल सेल अ‍ॅनिमिया हा लाल रक्तपेसशींमधील दोषामुळं होणारा आजार आहे. सिकल या शब्दाचा अर्थ होतो गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. जर सिकल सेल झालेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशींचं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केलं तर त्यांचा आकार हा विळ्याच्या आकारासारखा दिसतो. तर सामान्य माणसाचा आकार मात्र गोल दिसतो. लाल रक्तपेशींच्या सिकल शेपमुळं ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. सिकल सेलमुळं मुळातच रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं सर्वसामान्यांच्या तुलनेनं त्यांना त्वरीत संसर्ग होऊ शकतो. अशांना कोरोनाचीही जास्त भीती आहे.

तसं पाहिलं तर पाश्चिमात्य देशात बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेम सेल प्लांटेशन असे आधुनिक उपचारांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. परंतु या उपचार पद्धती अत्यंत खर्चिक आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना मात्र हे न परवडणारं आहे.

सिकल सेलग्रस्त रुग्णांनी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजरांपासून संरक्षणासाठी काही खास काळजी घेणं गरजेचं आहे. जर काहींना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांनी पुढील प्रतिबंधात्मक उपाय करणंही गरजेचं आहे.

1) सुरु असलेली औषधं तसंच औषधांमध्ये बदल करण्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2) रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अशा पदार्थांचं सेवन करावं. परंतु त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

3) व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खावेत. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारात जाती फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.

4) सिकल सेलग्रस्त रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. ती रोखण्यासाठी मासे, अंडी आणि पूरक आहार घ्यावा.

5) लॉकडाऊनच्या कालावधीत या व्यक्तींनी कामाव्यतिरीक्त बाहेर पडणं टाळावं.

6) सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.

7) घराचं आणि आजूबाजूच्या परिसराचं निर्जंतुकीकरण करा आणि स्वच्छता राखा.

8) गरज पडल्यास तात्काळ वैद्यकीय सेवेचा आधार घ्यावा.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.