जाणून घ्या अक्कल दाढ येण्याची लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दुधाचे दात पडल्यानंतर लहान मुलांना जे शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते त्यांना ‘विस्डम टीथ’ किंवा ‘अक्कलदाढ’ असे म्हटले जाते. हे दात कायमस्वरूपी असतात. अक्कलदाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा बुद्धीशी काहीही संबंध नसतो. अक्कल दाढ येण्याचे ठराविक असे वय नाही. पण साधारण विशी पार केली की अक्कल दाढ येते असे म्हणतात. अक्कल दाढेविषयी अनेकांची वेगवेगळी मत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल अगदी निश्चित आणि शास्त्रशुद्ध माहिती देता येणार नाही. पण तुम्हाला अद्याप अक्कल दाढ आलेले नसतील तर तुम्हाला दातांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही अक्कल दाढ येणार असतील तर त्रास तुम्हाला होऊ लागतो. जाणून घ्या अक्कल दाढ येताना कोणती लक्षणे जाणवतात.

हिरड्या दुखणे

अक्कल दाढ येताना हिरड्या दुखणे हे अगदी सर्वसाधारण लक्षण आहे. जर तुमच्या हिरड्या अगदी मागच्या बाजूला ( अक्कल दाढ) येतात त्या ठिकाणी सुजल्या असतील. अगदी जरासा धक्का लागल्यावर त्या दुखू लागल्या असतील तर समजून घ्या की, तुम्हाला अक्कल दाढ येत आहेत. अक्कल दाढ ही एकाएकी पटकन येत नाही. ती येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. जर तुम्हाला असा त्रास होऊ लागला की, लगेच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या.

कान दुखणे

अक्कल दाढ येताना कान दुखीचा त्रास होणेही अगदी स्वाभाविक आहे. तुम्हाला जर तुम्हाला कानात सतत ठणकत असेल आणि वरील सगळी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही दातांचे एकदा चेकअप करुन घ्या. कारण अक्कल दाढ येतानाही अशा प्रकारे कानदुखी होते हे अनेकांचे अगदी ठरलेले लक्षण आहे.

ताप येणे

अक्कल दाढ येताना ताप येणे हे अगदी स्वाभाविक आहे. खूप जणांना दात येताना ताप येतो. हा ताप इतका जास्त असू शकतो की, साथीच्या तापाप्रमाणे तुम्हाला काही दिवसांसाठी हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही योग्य औषधोपचार घ्या. हिरड्या फाडून अक्कल दाढ येते. तिची दिशा आणि आकार ठरलेला नसतो. त्यामुळे कधीकधी ती वाकडी येताना इतका त्रास होतो की, त्यामुळे कणकण जाणवते ते तर कधी ताप येणे स्वाभाविक आहे.

चिडचिड होणे

अक्कल दाढ येताना चिडचिड होते. खूप जणांमध्ये जाणवणारे हे लक्षण आहे. दाढ येताना हिरड्या इतक्या दुखतात की काहीही खाताना खूप त्रास होतो. त्यामुळे अगदी क्षुल्लक गोष्टीवरुन चिडचिड होणे अगदी स्वाभाविक असते. अशी सतत चिडचिड होत असेल तर तुम्ही थोंड धीराने घेणे गरजेचे आहे. रागामुळे तुमचा आहार आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष होऊ शकते. जे तुमच्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही.