शॅम्पूपासून बनवलेल्या दूधाची विक्री करून ‘ही’ भावंडाची ‘जोडगोळी’ बनली ‘करोडपती’

भोपाळ : वृत्तसंस्था – साधारणतः दूध हे शरीरासाठी उपयुक्त असा पदार्थ आहे. दूध सर्वांनी पिले पाहिजे असं नेहमीच सांगितल जाते. मात्र दुधाच्या जागेवर दूध समजून एखादे चुकीचे पेय पिले तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतात. मध्य प्रदेशमध्ये पोलीसांनी अशा दोन भावांना अटक केली आहे. जे शॅम्पूपासून दूध बनवून विकत होते. तब्बल ७ वर्ष हे भाऊ शॅम्पूपासून बनवलेले दूध विकत होते. त्यातून त्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली.

मध्य प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने देवेंद्र गुर्जर आणि जयवीर गुर्जर या दोन भावांना सिंथेटीक दूध बनवून विकण्याच्या आरोपात अटक केली आहे. एसटीएफने सांगितल्या नुसार दूधाच्या रूपात विष विकत होते. ७ वर्षांपूर्वी हे दोन्ही भाऊ मुरैना डेयरी फॉर्ममध्ये गाडीवर दूध पोहचवण्याचे काम करत होते. दुधाच्या धंद्यात नफा पाहून दोघांनी सिंथेटीक दूध बनवण्याचा धंदा सुरु केला.

ग्लूकोज, युरिया, रिफाइंड तेल, मिल्क पाउडर, पानी आणि शॅम्पू यांच्या मिश्रणातून सिंथेटीक दूध बनवत होते. ते दूध मध्य प्रदेशमधील वेग-वेगळ्या भागात पोहचवायचे. तसंच दुसऱ्या राज्यांमध्येही हे दूध पाठवले जायचे. या कामात हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील मोठ्या कंपन्यांचा यात समावेश आहे.

७ वर्षांच्या कालावधीत या दोन्ही भावांनी या धंद्यातून तीन बंगले, अनेक एसयूवी, दुधाचे टँकर, शेत जमीन आणि दोन पॅकीट बंद दुधाच्या कंपन्या खरेदी करत त्याचे मालक बनले आहेत.

दरम्यान, या गंभीर गुन्ह्या अंतर्गत एसटीएफचे पोलीस अधिक्षक राजेश भदोरिया यांनी ६ मुख्य आरोपी असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र गुर्जर, जयवीर गुर्जर रामनरेश गुर्जर, दिनेश शर्मा, संतोष सिंह आणि राजीव गुप्ता अशी यांची नाव आहेत. हे भाऊ एक लिटरचे दूध २५ रुपयांना विकत होते. जे तयार होण्यासाठी फक्त ६ रुपयांचा खर्च यायचा. त्यामुळे त्यांना ७०-७५ टक्के नेहमी नफाच मिळायचा, त्यामुळे त्यांनी हे नकली दूधाचा धंदा कायम ठेवला. मात्र आता त्यांचे पितळ उघडे पडले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –