T-20 World Cup | भारताला आणखी एक धक्का! ‘हा’ मध्यमगती गोलंदाज दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टीम इंडियाला T-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) अगोदर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियामध्ये (India) दुखापतीचे सत्र सुरु आहे. वर्ल्डकप अगोदर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे अगोदरच बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता आणखी एक गोलंदाज T-20 विश्वचषकातुन बाहेर पडण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये (Lucknow) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज दीपक चहरला (Deepak Chahar) दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पुढील दोन एकदिवसीय सामने खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता त्याचे T-20 विश्वचषक (T-20 World Cup) संघातील स्थानसुद्धा धोक्यात आले आहे.

 

आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary) आणि दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा चेतन साकारिया (Chetan Sakaria) ऑस्ट्रेलियामध्ये नेट बॉलर म्हणून टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत. दोघेही गुरुवारी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. दीपक चहरच्या घोट्याला वळण आले आहे पण ते तितकेसे गंभीर नाही. त्यामुळे त्याला काही काळ विश्रांती दिली जाऊ शकते. (T-20 World Cup)

जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला घ्यायचे हा टीम इंडियासोमर मोठा प्रश्न पडला आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) तंदुरुस्त असल्यास त्याला पहिले प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात मोहम्मद शमी संघात सामील होणार आहे. त्याला कदाचित त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.
पण अनुभव पाहता तो आयसीसी स्पर्धेचा भाग होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

 

Web Title :- T-20 World Cup | icc t20 world cup another blow for team india ahead of t20 world cup medium pacer out of series against africa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना