T-20 World Cup | इंग्लंडनं अभ्यास केला सूर्यकुमारचा पेपर आला हार्दिकचा, फलंदाजांचा उतावळेपणा पडला महागात

अ‍ॅडिलेड : वृत्तसंस्था – टी-20 वर्ल्डकपमधील (T-20 World Cup) टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमी फायनल (Semi Finals) अ‍ॅडिलेडमध्ये सुरु आहे. आजच्या सामन्यात (T-20 World Cup) इंग्लंडने टॉस जिंगून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. भारताचा सलामीवीर के.एल.राहुल (KL Rahul) दुसऱ्याच षटकात 5 रन्स काढून बाद झाला. तर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 27 धावा करुन बाद झाला. भारताला सर्वाधिक अपेक्षा ज्या खेळाडूकडून होत्या तो सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 14 धावा करुन बाद झाला. तर दुसरीकडे विराट कोहलीने (Virat Kohli) 50 धावा करुन भारताचा डाव सावरला. मात्र, भारताच्या धावसंख्येला आव्हानात्मक स्थितीत पोहोचवण्याचं काम केलं ते हार्दिक पांड्याने (Hardik Pandya). त्याने चौकार मारुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

 

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानावर आला. सूर्याचा फॉर्म बराच बोलका आहे आणि आयसीसी नंबर 1 फलंदाजासाठी इंग्लंडने खास तयारी केली होती. सूर्याने बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) षटकात षटकार व चौकार खेचून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पण इंग्लंडने अभ्यास केला होता. आदिल रशीदचे (Adil Rashid) एक षटक सूर्यासाठीच राखून ठेवले होते. प्रयत्न करुनही धावा होत नसल्याने सूर्याने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला अन् तिथेच त्याची चूक झाली. रशीदने संथ पण वळणदार चेंडू टाकला आणि पुढे येऊन मारलेला फटका डीप कव्हरच्या दिशेने गेला. फिल सॉल्टने (Phil Salt) सहज झेल टीपला. सूर्या 10 चेंडूत 14 धावा करुन परतला.(T-20 World Cup)

सूर्य़कुमार यादव बाद झाल्यानंतर कोहलीला पांड्याने संथगतीने साथ दिली.
मग कोहली 50 धावा करुन बाद होताच पांड्याने गिअर अप करत तुफान फटकेबाजी सुरु केली.
त्याने 33 चेंडूत 63 धावा ठोकल्या. पण शेवटच्या चेंडूवर तो चुकीने हिटविकेट झाला.
त्यामुळे भारतीय डावाचा अखेरचा चेंडू निर्धाव राहिला. त्यामुळे भारताने 168 धावा केल्या असून इंग्लंडला विजयासाठी 169 धावांची गरज आहे.

 

Web Title :- T-20 World Cup | t20 world cup ind vs eng sf live suryakumar yadav departs for 14 in 10 balls adil rashid take a wicket massive moment in the match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Ponkshe | ‘हर हर महादेव’च्या समर्थनात शरद पोंक्षे म्हणले, ‘तुम्ही गुंड आहात का? हा शुद्ध हलकटपणा…’

Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू