Coronavirus : टी-सीरिजच्या सुरक्षारक्षकाला ‘कोरोना’ झाल्यामुळे इमारत ‘सील’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात संगीत क्षेत्रातील लोकप्रिय टी -सीरिज या कंपनीच्या सुरक्षारक्षकाला कोराना झाल्यामुळे इमारत सील करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे गावी न जाता आल्यामुळे हा कर्मचारी ऑफिसच्याच इमारतीत राहत होता. ही इमारत अंधेरी वेस्ट लिंक रोड येथे आहे.

देशात लॉकडाउन असल्यामुळे कंपनीतील काही सुरक्षारक्षक त्यांच्या गावी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे कंपनीमध्येच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टी-सीरिजच्या इमारतीत एक-दोन सुरक्षारक्षक राहत होते. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याच्यासोबत राहणार्‍या अन्य दोन जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट्स आलेले नाहीत.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ही इमारत सील करण्यात आली आहे. या कर्मचार्‍याव्यतिरिक्त येथे आणखीही काही जण राहत होते. ज्यांना त्यांच्या गावी जाणे शक्य नसल्यामुळे दोनजण तिथे राहत होते. त्यापैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासंदर्भात टी-सीरिजच्या प्रवक्त्यांनी आम्ही 15 मार्चपर्यंत ऑफिस बंद ठेवले होेते. त्यामुळे सगळे कर्मचारी घरुनच काम करत असल्याचे सांंगितले आहे.