T20 Cricket | टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; फक्त 15 बॉलमध्ये जिंकला सामना

पोलीसनामा ऑनलाईन : आपण आजपर्यंत क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात नवनवीन विक्रम होताना पहिले आहेत. सध्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T- 20 World Cup) पात्रतेसाठी आफ्रिकनं देशांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये अशाच एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळं अस्तित्व असणारी केनियाची (Kenya) टीम सध्या खूप तळाला आहे. याच केनियाच्या टीमने एक नवा विश्वविक्रम केला आहे. केनियाने मालीविरुद्धचा (Mali) सामना एकही विकेट न गमावता फक्त 15 बॉलमध्ये जिंकला. टी20 क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात सर्वाधिक बॉल बाकी ठेऊन जिंकलेला हा सामना ठरला आहे.

मालीचा संघ अवघ्या 30 धावांत गार
या सामन्यात वेगवान गोलंदाज पीटर लँगाटच्या (Peter Langat) माऱ्यासमोर मालीची पूर्ण टीम 30 धावात गार झाली. या सामन्यात माली संघाने 10.4 ओव्हर्स खेळल्या मात्र त्यांना त्यामध्ये फक्त 30 धावा करता आल्या. या खेळीमध्ये माली संघाच्या 6 खेळाडूंना आपले साधे खातेही खोलता आले नाही. त्यानंतर 31 धावांचं लक्ष्य केनियाचा कॅप्टन कॉलिन्स ओबुया (Collins Obuya) (18) आणि पुष्कर शर्मानं (Pushkar Sharma) (14) 2.3 ओव्हर्समध्येच पूर्ण करत नवा विश्वविक्रम नोंदवला.

ऑस्ट्रियाचा विक्रम मोडला
2019 साली ऑस्ट्रियानं (Austria) तुर्कीचा (Turkey) 10 विकेट्सनी पराभव केला होता.
तेव्हा ऑस्ट्रियानं अवघ्या 16 बॉलमध्ये सामना जिंकला होता. मात्र या सामन्यात केनियाने ऑस्ट्रियाचा तो विक्रम मोडित काढत अवघ्या 15 बॉलमध्ये सामना जिंकता नवा विश्वविक्रम (World Record) आपल्या नावावर केला.

Web Title :- T20 Cricket | kenya cricket team historic win over mali in icc qualifying tournament