क्रीडाताज्या बातम्या

T20 WC | पराभवानंतर विराट कोहलीच्या कुटुंबाला मिळतेय धमकी? ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था T20 WC | टी20 वर्ल्ड कप 2021 च्या दुसर्‍या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरूद्ध आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय टीमचे सेमीफायनलमध्ये पोहचणे खुपच अवघड झाले आहे. सध्याच्या टी20 वर्ल्डकपच्या (T20 WC) पहिल्या सामन्यात सुद्धा भारताला पाकिस्तानने दहा विकेटने पराभूत केले होते.

 

टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हकने सांगितले की, त्यांना माहिती मिळाली आहे की,
भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या कुटुंबियांना धमकी मिळत आहे.
इंजमामने आपला यूट्यूब चॅनल ’द मॅच विनर’ वर असे म्हटले आहे.

 

इंजमाम उल हकने म्हटले, ’हा खेळ आहे आणि यामध्ये जय-पराजय होत असतो.
मी टीव्ही पहात होतो आणि मी ऐकले की विराट कोहलीच्या छोट्या मुलीला धमक्या दिल्या जात आहेत.
विराट कोहलीचे नेतृत्व किंवा फलंदाजी पसंत नसेल तर त्यावर तुम्ही बोलू शकता.
मला वाटते कुटुंबावर कुणीही जाऊ नये. (T20 WC)

 

इंजमामने पुढे म्हटले, काही दिवसांपूर्वी शमीच्या बाबतीत सुद्धा असेच घडले होते. हा खेळ आहे ज्यामध्ये कधी चांगली कधी वाईट कामगिरी होत असते.
हे खेळापर्यंतच मर्यादित ठेवा, पुढे घेऊन जाऊ नका. मला खुप वाईट वाटले, असे हाऊ नये.
भारताची बॅटिंग, बॉलिंग आणि टीमच्या निवडीवरून तुम्ही टिका करू शकता.
पराभव सुद्धा पचवता आला पाहिजे. (T20 WC)

 

Web Title : T20 WC | inzamam ul haq claimed that virat kohli daughter vamika has received threats after defeat against new zealand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! फ्रेन्डस् इलेव्हन संघाची विजयी सलामी; वैंकिज् इलेव्हनचा दणदणीत विजय

Pune Cyber Crime | पुण्यात ‘टाटा मोटर्स’च्या नावाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस 

Back to top button